शिरूड येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेना उबाठात प्रवेश
जनसंघर्ष न्यूज
धुळे - धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील शिरूड जिल्हा परिषद. गटातील सामाजिक कार्यकर्ते यांनी बुधवार दि. 24 रोजी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील व जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे प्रवेश केला. शिरूड येथील किशोर भाऊ पवार यांच्यासह सुनील हुजरे , राजेंद्र पवार, दिलीप जावळे, जितेंद्र सपकाळ, बाबाजी जावळे, समाधान पवार, शामकांत शेजवळ, विनोद शिंदे, अण्णा रटके, जिगर पटेल, ईश्वर पवार आदींनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी प्रथम महापौर भगवान बापूजी करणकाळ . उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, तालुकाप्रमुख बाबाजी पाटील ,तालुका संघटक भैय्यासाहेब हेमराज पाटील.. तालुका समन्वयक सरपंच प्रकाश वाघ महिला आघाडीच्या संगीता जोशी,जयश्री वानखेडे,सुनिता शिरसाठ, अरुणा मोरे आदींसह शिरूड येथील शिवसैनिक शिवसैनिक उपस्थित होते.

