धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच MD ड्रग्जची तस्करी उघड ; धुळे LCB ची दमदार कारवाई

0



धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच MD ड्रग्जची तस्करी उघड ; धुळे LCB ची दमदार कारवाई 

 17 लाख 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा, धुळे कडुन जप्त

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- दि. 25 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना गोपनीय बातमी मिळाली होती की, धुळे शहरात इसम नामे सैय्यद आतिक सैय्यद रफीक रा. मालेगांव, जिल्हा नाशिक हा त्याच्या साथीदारासह कार क्रमांक GJ 16 DS 0314 मध्ये मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा गुंगीकारक अंमली पदार्थ Methedrone (MD पावडर) घेवून जळगांव कडून धुळे कडे येत आहे. NDPS अॅक्ट मधील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन छापा कारवाईसाठी पोलीस अधीक्षक, धुळे श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांचे पथक तयार करण्यात आले. गोपनीय बातमीच्या अनुषंगाने मोहाडी शिवारातील हॉटेल रेसिडन्सी पार्क जवळील नवीन नागपूर सुरत महामार्गावर कार क्रमांक GJ 16 DS 0314 हे थांबविण्यात आले असता वाहनातील दोन संशयित इसमांनी वाहनातून उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शिताफीने पकडले. नमुद वाहनातील संशयित इसम 1) सैय्यद आतिक सैय्यद रफीक, वय 37 वर्ष रा. ओल्ड आग्रा रोड न्यु फरहान हॉस्पीटल मालेगांव जिल्हा नाशिक व 2) मजहर खान युसूफ खान, वय 33 वर्षे, रा बासवाडा, तहसील पत्रीगंज खिडकी, जि बासवाडा, राज्य राजस्थान यांची अंगझडती घेतली असता संशयित सैय्यद आतिक सैय्यद रफीक याचे ताब्यात 104 ग्रॅम वजनाची सफेद पावडरची पुडी मिळून आल्याने त्यास विचारपुस केली असता त्याने सदरचा माल हा MD पावडर असल्याची कबुली दिली. घटनास्थळी हजर असलेल्या फॉरेन्सिक व्हॅन टीम कडून मिळून आलेल्या MD पावडरची प्राथमिक तपासणी करून 10,40,000/- रुपये किंमतीची सफेद रंगाची Methedrone (MD) पावडर, 7,00,000/- रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची गुंडाई कंपनीची कार क्र GJ 16 DS 0314, 11,000/- रुपये किंमतीचे 03 मोबाईल फोन असा एकूण 17,51,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आला आहे.

      सदर आरोपी  1) सैय्यद आतिक सैय्यद रफीक, वय 37 वर्ष रा. ओल्ड आग्रा रोड न्यु फरहान हॉस्पीटल मालेगांव जिल्हा नाशिक व 2) मजहर खान युसूफ खान, वय 33 वर्षे, रा बासवाडा, तहसील पत्रीगंज खिडकी, जि बासवाडा, राज्य राजस्थान हे वरील वर्णनाचा व किंमतीचा अंमली पदार्थ Methedrone (MD) पावडर विक्री करण्याच्या उददेशाने ताब्यात बाळगतांना मिळून आले म्हणून त्यांच्या विरुध्द मोहाडीनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 258/2025, NDPS कायदा सन 1985 कलम 8(क), 21(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना  गुन्ह्याचा तपास कामी अटक करण्यात आली आहे.

      अटक आरोपींनी यापूर्वी अनेकवेळा धुळे शहरात येऊन MD ड्रग्जची विक्री केली असलेबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. सदर ड्रग्जचा वापर हा विशेषतः उच्चभ्रु लोकांचे पार्टी मध्ये केला जातो. तरी MD ड्रग्ज धुळे शहरातील व जिल्ह्यातील कोणाकडे विक्रीसाठी जात होता व या ड्रग्जचे खरेदीदार कोण आहेत याचा तपास सुरु आहे.

      सदर कामगिरी श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, श्री. अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक श्री. चेतन मुंढे, संजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल सानप, पवन गवळी, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकुर, प्रकाश सोनार, जगदीश सुर्यवंशी, अमोल जाधव यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)