आधार प्रकल्पातील वृद्धांसोबत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

0


आधार  प्रकल्पातील वृद्धांसोबत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पाअंतर्गत "आधार प्रकल्पा"तर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता विश्वासनगर, कुंडाणे येथे घेण्यात आला.

समता शिक्षण संस्था, पुणेचे सचिव व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे  प्रकल्पाचे संचालक डॉ. जालिंदर अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकल्प  समन्वयक प्रा. रचना अडसुळे यांच्या नियोजनात हा उपक्रम राबविण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती. सुनिता पाटील (कार्यक्रम अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे) यांनी केले.  कार्यक्रमाप्रसंगी लाभलेले प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून  मा. श्री. संजय सैंदाणे (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण धुळे) यांनी "वृद्धांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना" या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी श्री. सैंदाणे यांनी आदिवासी वृद्धांच्या जीवनशैली विषय चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. पुढे त्यांनी समाजकल्याण खात्यातील जेष्ठ नागरिकांच्या योजनाचा लाभ पुरेपूर देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. 

यावेळी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रमोद भुंबे, कुंडाणे गावचे पोलीस पाटील श्री. दयानंद गावित, बार्टी धुळे जिल्हा समन्वयक श्री. निवृती शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे नियोजन गणेश उफाडे यांनी केले. याप्रसंगी अक्षय भुसारे ह्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर आम्रपाली वाघ हिने उपस्थितांचे आभार मानले.  या कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयातील क्षेत्रकार्य विद्यार्थी कोमल शिंदे, अनिल बागुल, दीप्ती चिकाटे, तसेच  महेश खैरनार यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)