विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांचा मनमानी कारभाराची चौकशी करून निलंबित करा - रिपब्लिकन सेनेची मागणी

0

 

विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांचा मनमानी कारभाराची चौकशी करून निलंबित करा - रिपब्लिकन सेनेची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

    धुळे :- राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेले विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ राजेंद्र देवरे राहणार धुळे हे वेळोवेळी त्यांच्या पदाचा गैरवापर करत मनमानी कारभार करत असून त्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारींना  रिपब्लिकन सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांनी दिले आहे. 

          सदर निवेदनात म्हटले आहे की, विभागीय वाहतुक अधिकारी सौरभ राजेंद्र देवरे हे मार्ग तपासणी वाहनांचा विनापरवानगी गैरवापर करत असतात. G.R. क्र.राप/वाह/मार्ग तपासणी/6186 म.रा.मा.प. महामंडळ मध्यवर्ती कार्यालय, डॉ. आनंदराव नागर मार्ग, मुंबई-400 008 दि. 16 नोव्हेंबर 2009 / G.S.O. No.5, GS.O. No.129, G.S.O. No.223, प्रमाणे मार्ग तपासणी या कलमान्वये वाहनाचा वापर फक्त मार्ग तपासणी अधिकारीच करू शकतात, परंतु तसं मोठमोठे जीआर असून सुद्धा श्री. सौरभ राजेंद्र देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी हे त्या गाडीचा खाजगी कामासाठी वापर करतात, उदाहरणार्थ गाडी घरी घ्यायला येणे, त्यांना ऑफिसला सोडायला येणे, नंदुरबार, शहादा, शिंदखेडा, दोंडाईचा, आणि साक्री असे अनेक ठिकाणी ते गाडीचा खाजगी वापर करत असतात, रोज संध्याकाळी गाडी त्याना घरी सोडायला येते.

       श्री. सौरभ राजेंद्र देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी धुळे यांचा गाडी खाजगी वापर करत असताना लोकेशन, फोटो, व्हिडिओ, कॉल रिकॉर्डिंग माझ्याकडे पुरावे म्हणून आहेत. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून श्री. सौरभ राजेन्द्र देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी राज्य परिवहनाचे मार्ग तपासणी पथकाचे वाहन हे खाजगी स्वरूपात वापरून राज्य परीवहन महामंडळाचे आर्थिक नुकसान करुन प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहेत.

         सदर सौरभ राजेंद्र देवरे विभागीय वाहतूक अधिकारी हे त्यांचा पदाचा गैरवापर करीत आहेत असे असताना देखील त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठबळ देतात. तरी सदर बाब ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.

       सदर विषयाची सविस्तर चौकशी करून शासनाच्या परिपत्रकानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, संबंधित अधिकारी श्री. सौरभ राजेंद्र देवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा...

     अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने धुळे मा. विभागीय नियंत्रण साो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या कार्यालयाच्या मुख्य गेटला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परिणामास प्रशासन स्वतः जबाबदार राहणार असा इशारा देण्यात आला आहे.

     यावेळी निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष समाधान भाऊ बैसाणे, महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष धुळे संजनाताई अहिरे व किरण भाऊ अम्बुरे अदि. पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)