सोशल मीडियावर आदिवासी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या राणी कुमावत व प्रेम कुमावत त्यांच्यावर कारवाई करा... - आदिवासी संघटनेने निवेदन
जनसंघर्ष न्यूज
एरंडोल - येथील भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य तर्फे सोशल मीडियावर राणी कुमावत व प्रेम कुमावत या दोघ भाऊ व बहिणी यांनी अश्लील भाषेत आदिवासी नावाने समाजाला शिवीगाळ करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्या बद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक जळगाव यांना पोलिस निरीक्षक एरंडोल यांच्या माध्यमातून देण्यात आले.
निवेदनात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या शब्दाचा व शासकीय पोलिस यंत्रणा यांना चॅलेंज करत नाशिक येथील राणी कुमावत व प्रेम कुमावत या भाऊ बहीण यांनी आदिवासी समाजाला शाब्दिक अश्लील भाषा वापरत व्हिडिओ काढून पोस्ट करत कोणत्याही एका व्यक्तीला न बोलता समस्त आदिवासी समाजाला अपमानित करीत अपशब्द वापरुन आक्षेपार्ह शब्द वापरले असल्याचे म्हटले आहे असून सदर व्हिडिओ धारक हा इतर समाज असून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत असणाऱ्या व्यक्ती विरोधात कुमावत यांनी गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे.शेवटी आदिवासी समाजाला खालच्या दर्ज्याची वागणूक देत आदिवासी समाजाची इज्जत,औकात काढल्याने सदर वक्तव्य हीन दर्जाचे असून संविधानाच्या कलमा नुसार अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आदिवासी संघटना जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख दिपक अहिरे , तालुकाध्यक्ष भैय्या मोरे,सोशल मीडिया जिल्हा प्रमुख सागर वाघ,युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे,एरंडोल शहर कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण जावळे,मधुकर सोनवणे दिपक मोरे वासुदेव भिल यांच्या सह्या आहेत.

