15 हजाराच्या लाचेसाठी मुख्याध्यापकासह शिक्षकाने विकली लाज
धुळे एसीबीने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरीचा केला पर्दाफाश
जनसंघर्ष न्यूज
धुळे - जनता शिक्षण प्रसारक संस्था ,बेटावद ता. शिंदखेडा जि. धुळे संचलित महात्मा गांधी विद्यालय मांजरोद ता. शिरपूर येथे तक्रारदार उपशिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांची 2023 पासून एक वर्षाकरिता वार्षिक वेतन वाढ स्थगित करण्यात आली होती तसेच त्यांना सेवेत बारा वर्षे पूर्ण होऊन देखील वरिष्ठ वेतनश्रेणी लागू केले नसल्याने तक्रारदार यांनी यांनी शाळेचे मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील वय 52 यांची भेट घेऊन त्यांचा स्थापित केलेली वेतन वाढ व वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करणे बाबत विनंती केली असता मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी तक्रारदारी यांच्या स्थगित केलेली वेतन वाढ व वरिष्ठ वेतन सगळ्यांना लागू करण्यासाठी उपशिक्षक गोपाळ पाटील यांच्याकडे 15000 रुपये द्यावे लागतील त्याशिवाय तुमचे काम होणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालय येथे दूरध्वनी द्वारे माहिती दिली असता सदर माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिरपूर येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली.
वरील तक्रारीवरून दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी पडताळणी केली असता लाचखोर मुख्याध्यापक कैलास सखाराम पाटील यांनी तक्रारदार यांना त्यांच्या कामाबाबत उपशिक्षक गोपाल रघुनाथ पाटील वय 47 यांना भेटण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आरोपी नंबर 2 गोपाल रघुनाथ पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 15000 रुपये लाचेची मागणी करून लाज स्वीकारण्याचे मान्य केले असता त्यानंतर दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापडा रचून महात्मा गांधी विद्यालय मांजरोद ता. शिरपूर येथे कार्यरत असलेले उपशिक्षक गोपाल रघुनाथ पाटील वय 47 यांना तक्रारदार यांच्याकडून 15000 रुपये लाचेची रक्कम स्वतः स्विकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. धुळे त्यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोहेकाॅ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, पोकॉ. मकरंद पाटील , प्रवीण पाटील ,प्रशांत बागुल, सागर शिर्के ,रितेश चौधरी,मपोकॉ. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी यशस्वी केली.
लाचलुचप प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईने शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ज्या शाळेत पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळेत पाठवतात ज्या शाळेला महापुरुषाचे नाव आहे. अशा या महात्मा गांधी विद्यालय मांजरोद येथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या धडे शिकविण्याचे सोडून स्वतः मुख्याध्यापक शेणखत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट तयार झाले आहे.

