शेतकऱ्यांच्या शेती साहित्याची चोरी; मेहकर तालुक्यात खळबळ, हिवाळी अधिवेशनावर आंदोलनाचा इशारा

0

 

शेतकऱ्यांच्या शेती साहित्याची चोरी; मेहकर तालुक्यात खळबळ,

 हिवाळी अधिवेशनावर आंदोलनाचा इशारा

जनसंघर्ष न्यूज

बुलढाणा प्रतिनिधी -दिपक देशमुख 

      मेहकर :-  डिसेंबर गेल्या काही दिवसांपासून मेहकर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचे साहित्य, अवजारे आणि जनावरे चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, यामुळे शेतकरी वर्गात मोठी भीती आणि असंतोष पसरला आहे. या प्रकरणांना स्थानिक पोलीस गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप होत असून, पोलिसांनी तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत, तर आगामी हिवाळी अधिवेशनावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अॅड. रामेश्वर स. पळसकर यांनी दिला आहे.

चोरीच्या घटनांचा सपाटा

प्रत्येक वर्षी चोरीच्या घटना घडतात, परंतु यावर्षी चोरट्यांनी कहर केला आहे. गेल्या काही दिवसांत मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून स्प्रिंकलर, पाईप, मोटार, केबल आणि इतर शेती उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणावर चोरीला गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

शेतकरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यानंतर, त्यांचा रिपोर्ट 'एन.सी.' (NC) म्हणून नोंदवून त्यांना थातूर-मातूर उत्तरे दिली जात आहेत, असा अर्जदाराचा आक्षेप आहे. यामुळे या सर्व प्रकरणांना मेहकर तालुक्यातील कोणतेच ठाणेदार गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोलिसांच्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास उडाला असून, त्यांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी बुलढाणा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पथक नेमण्याची मागणी केली आहे.

आंदोलनाचा इशारा

डोंणगाव येथील अॅड. रामेश्वर स. पळसकर यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे ही गंभीर परिस्थिती मांडली आहे. जर पोलीस प्रशासनाने या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी असा इशारा देण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)