बोगस गैर आदिवासी लोकांना प्रमाणपत्र टोकन देऊ नका -
राष्ट्रवादी (श.प.गट ) आदिवासी सेलचे जात पडताळणी सहाय्यक आयुक्त यांना निवेदन
जनसंघर्ष न्यूज
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. लवकरच महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका देखील जाहीर होतील अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आदिवासी जात पडताळणी समिती, धुळे यांच्या वतीने गैरआदिवासी उमेदवारांना टोकन देण्यात येते व खऱ्या आदिवासींवर अन्याय होत आहेत.
तरी सदर बाब लक्षात घेऊन गैर आदिवासींना टोकन देण्यात येऊ नये, व आदिवासींवर अन्याय होणार नाही, याची जात पडताळणी समिती धुळे, यांनी दक्षता घ्यावी असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी मा.आयुक्त आदिवासी जात पडताळणी समिती देवपूर धुळे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी आदिवासी सेल ( श. प. गट )चे अध्यक्ष कुणाल ( बंटी दादा ) वाघ, गोविंदा भाऊ आहिरे , प्रविण मोरे, अक्षय सोनवणे, विनायक मोरे, यश मालचे, दिपक माळी, लखन पवार, सागर वाघ, शुभम ठाकरे, गोविंदा माळी, प्रकाश ठाकरे, अनिल अहिरे, विकी वाघ, किसन सोनवणे सह राष्ट्रवादी आदिवासी सेल ( श. प. गट )चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

