एम आय एम चे २२ उमेदवारांपैकी एक गद्दार निघाला तरी २१ उमेदवार निवडून येणारचं - इर्शादभाई जहागीरदार
आमची लढाई भाजपा विरोधात ; विकास आणि भ्रष्टाचार या दोन मुद्द्यांवर आम्ही जनतेसमोर
जनसंघर्ष न्यूज
प्रतिनिधी - सिद्धार्थ मोरे
धुळे :- महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने २२ उमेदवार दिले होते यापैकी निवडणूकीत शेवटच्या दिवशी एमआयएम चे माजी जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांनी माघार घेत पत्रकार परिषद घेऊन इर्शाद भाई जहांगीरदार यांच्यावर पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप केल्यानंतर आज दिनांक ३ जानेवारी रोजी इर्शाद जहांगीरदार यांनी चाळीसगाव रोड येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नासिर पठाण यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मी पैसे घेऊन तिकीट दिले असेल तर सिद्ध करून दाखवा मी आजच राजकारण सोडेल असे इर्शाद भाईंनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाची चाप लावणार. महापालिकेत आम्ही किंगमेकर राहू, धुळ्याची जनता आमच्यासाठी किंग आहे. या निवडणुकीत एमआयएमचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार निवडून येतील असा दावा एमआयएमचे नेते इर्शादभाई जहागिरदार यांनी केला आहे.
धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील एमआयएम पक्ष कार्यालयात इर्शादभाईंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. इर्शादभाई म्हणाले की, आमची लढाई ही सामाजिक न्यायासाठीची आहे. विकास आणि भ्रष्टाचार या दोन मुद्द्यांवर एमआयएम पक्ष महापालिका निवडणुकीत जनतेसमोर जात राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी ठरणारी आहे. आम्ही धुळे महानगरपालिकेत किंग मेकरच्या भुमीकेत असणार आहोत, धुळेकर जनता आमच्यासाठी किंग आहे. भाजपाने महापालिकेच्या सत्ता काळात प्रचंड भ्रष्टाचार केला. त्यांची मनमानी होती. धुळेकरांसाठी, धुळ्यातील जनतेची आर्थिक लुट थांबविण्यासाठी आमचे नगरसेवक महापालिकेत धुळेकर जनतेची बाजू भक्कमपणे मांडतील. ही निवडणुक भाजपा विरोधात आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर सत्तेसाठी भाजपा सोबत जाणार का ? अशी विचारणा केली असता इर्शादभाई म्हणाले की, भाजपासोबत जाणे कधीही शक्य नाही. त्यांना सत्ता स्थापणेसाठी मदत होईल अशी भुमिका एमआयएम कधीही घेणार नाही. महापालिका निवडणुकीत आम्ही २२ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी एकाने माघार घेतली आहे. आम्ही सर्व २१ जागा जिंकणारच मनपा निवडणुकीत एमआयएमचा स्ट्राईक रेट ९० टक्के राहील असेही इर्शादभाई म्हणाले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष नासीर पठाण यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना इर्शादभाई जहागिरदार म्हणाले की, नासिर पठाण हे आता जिल्हाध्यक्ष नाहीत ते माजी जिल्हाध्यक्ष आहेत. मी कोणतीही मनमानी तिकीट वाटपात केलेली नव्हती. नासिर पठाण यांच्या म्हणण्यानुसारच उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात आली. त्यांच्या मतानुसारच पॅनल तयार करण्यात आले होते. परंतु त्यांनी पक्षाला फसविले. नासिर पठाण हे गद्दार आहेत असा प्रहार इर्शादभाईनी केला. मी तिकीटासाठी पैसे घेतल्याचे सिध्द केल्यास राजकारण सोडेल असा पलटवार विरोधकांवर इर्शादभाईंनी केला.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष ओवेसी, माजी खासदार इम्तीयाज जलील, माजीद हुसेन येणार असल्याचे देखील इर्शादभाई यांनी सांगितले.
यापत्रकार परिषदेत माजी उपनगराध्यक्ष तथा एमआयएमचे प्रभाग क्र.४ चे उमेदवार ईस्माईल पठाण यांनी सांगितले की, नासिर पठाण हा गद्दारी करेल त्याला तिकीट देवू नका असे मी, इर्शादभाईंना सांगितले होते. परंतु इर्शादभाई हे पटकन विश्वास ठेवणारे नेते असल्याने त्यांनी नासिर पठाण यांच्यावर विश्वास ठेवला पण माझे शब्द खरे ठरले. नासीर पठाणनने गद्वारी केली. या पत्रकार परिषदेला एमआयएमचे उमेदवार देखील उपस्थित होते.

