अकलाड येथील जि.प. शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात

0

 

अकलाड येथील जि.प. शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, अकलाड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेत विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मनोगत व भाषणे सादर केली.

          स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत मांडली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर रायते, तसेच संगिता वाघ, अजयकुमार बच्छाव, दिनेश राजभोज, राजेंद्र सोनवणे व योगिता पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून बालिका शिक्षणाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः मुलींमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण झाली. बालिका सशक्तीकरणाचा संदेश देत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)