धुळे महानगरपालिका: नूतन 'स्थायी समिती सभापती' पदाचा कार्यभार मा. सौ. लताबाई सोनार यांनी स्वीकारला, पदग्रहण सोहळा थाटात संपन्न
जनसंघर्ष न्यूज
धुळे प्रतिनिधी - सिद्धार्थ मोरे
धुळे :- महानगरपालिकेच्या नूतन स्थायी समिती सभापती म्हणून मा. सौ. लताबाई यशवंत सोनार (पोतदार) यांनी आपला पदभार अधिकृतरीत्या स्वीकारला आहे. धुळे महानगरपालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेला हा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या महत्त्वपूर्ण प्रशासकीय सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, नगरसेवक, आणि युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. दिनेश भाऊ पोतदार यांच्यासह शहरातील नागरिक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन स्थायी समिती सभापतींच्या नेतृत्वाखाली शहराच्या प्रलंबित विकासकामांना आणि प्रशासकीय निर्णयांना निश्चितच नवी गती मिळेल, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला असून, सौ. लताबाई सोनार यांना त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी आमदार अनुप अग्रवाल , जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, कुणाल पाटील, दिनेश पोतदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
