जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिजाऊ कन्यांनी राखली यशाची परंपरा कायम.
जनसंघर्ष न्यूज
धुळे:- फेब्रुवारी -मार्च 2026 मध्ये संपन्न झालेल्या विभागीय मंडळाच्या उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा निकाल नुकताच अनुक्रमे दिनांक 02 व 08 मे 2026 रोजी घोषित झाला त्यात
श्री.शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीनी यशाची परंपरा कायम राखत विद्यालयाच्या नावलौकीकात भर टाकली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 92.50% लागला असून त्यात कु.खुशी कैलास माळी 10 वी हीने 86.20 % गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला तर 10वी क ची कु.गायत्री विलास शिरसाठ हिने
86 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु.देवयानी सुरेश पाटील हिने 85.60 %गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक पटकावला तसेच उच्च माध्यमिक विभागातून कु.प्रतिक्षा नाना कापुरे 71%गुणांसह प्रथम कु.अमृता आनंदा गवळी 68.33%द्वितीय तर तृतीय क्रमांक कु.सनोबर अजिम शेख हिने 68% गुणासह पटकावला
यशस्वीतांचे संस्थेचे चेअरमन धुळे ग्रामीणचे जलदुत मा.आमदार कुणालबाबा पाटील संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.एस.टी.पाटील, तथा सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .
यशस्वीतांचे विद्यालयाच्या प्राचार्य सौ.अपर्णा विजय पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सन्मानित केले प्रसंगी उपमुख्याध्यापिका श्रीमती एस.व्ही.अडकमोल, जेष्ठ शिक्षक ,श्री. मनोहर मगर,मुकेश येवलेकर,संजय देवरे संदीप परदेशी, चंद्रकांत ई.पाटील, रमेश यादव, उमेश भदाणे, सचिन रवंदळे, मनोज पी.पाटील, लक्ष्मण के.गवळी,चंद्रकांत टी पाटील, अभिजीत पाटील, लक्ष्मीकांत ठाकरे, तथा सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
