धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गुंगीकारक औषधांचा १०.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

 


धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गुंगीकारक औषधांचा १०.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : गुंगीकारक औषधांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १० लाख ५१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत कोडीनयुक्त कफ सिरपच्या ४१० बाटल्या, एक इनोव्हा कार व मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचण्यात आला. यावेळी गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी एजाज रफीक शेख (वय २५) याच्या ताब्यातून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या कोडीनयुक्त कफ सिरपच्या बाटल्या आढळून आल्या.

कारवाईदरम्यान REXTON-T आणि CANAX-T या ब्रँडच्या एकूण ४१० बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच आरोपीकडील इनोव्हा कार (क्रमांक GJ-16/BB-2607) आणि मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख ५१ हजार २५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा तसेच औषध व सौंदर्यप्रसाधने अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासादरम्यान सुरत येथून आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून या अवैध साखळीचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)