मंगळवार, ३० जून, २०२६

धुळ्यात २०० कोटींच्या जमिनी घोटाळ्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी



धुळ्यात २०० कोटींच्या जमिनी घोटाळ्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

बनावट कागदपत्रे, महसूल व आयकर विभागाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप; संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जनसंघर्ष न्यूज 

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील कथित २०० कोटी रुपयांच्या मौल्यवान जमिनीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत रफीक शाह गुलाब शाह यांनी जिल्हाधिकारी, धुळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात संबंधित जमीन, महसूल नोंदी, संमतीपत्र, अधिकारपत्र तसेच फेरफार प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने बनावट दस्तऐवज तयार करून महसूल विभाग व आयकर विभागाची दिशाभूल केली असून, नियमबाह्य पद्धतीने जमिनीवरील हक्क मिळवून मोठा आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात काही महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदाराने यापूर्वीही विविध शासकीय कार्यालये व पोलिसांकडे निवेदने दिल्याचा दावा केला असून, अद्याप ठोस कारवाई न झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बनावट कागदपत्रे तयार करणारे तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

लेबल: , ,

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ