बाळापुर उपनगर येथे मंजूर झालेला बस स्टॉप बस लवकरात लवकर सुरू करा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

0


 बाळापुर उपनगर येथे मंजूर झालेला बस स्टॉप बस लवकरात लवकर सुरू करा 

भाजपा कामगार मोर्चा चे सरचिटणीस अंकुश नंदवाळकर यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

जनसंघर्ष न्यूज 

             धुळे :- तालुक्यातील बाळापुर उपनगर  येथे बस थांबाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग यांच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून बस स्टॉप ची मागणी करत आहे व तेथे बस स्टॉप देखील मंजूर झाला असून परंतु त्या ठिकाणी कोणत्याही बसेस थांबत नाहीत या संदर्भात अनेक वेळा राज्य परिवहन महामंडळ धुळे विभागाला लेखी स्वरुपात तक्रार देखील करण्यात आली आहे परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्र पूर्तता केलेली नाही व कोणतीही कारवाई केलेली नाही यामुळे बाळापुर गावाच्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. 

           बाळापुर उपनगर हे महापालिका हद्दवाढीत आलेले असून या गावाची लोकसंख्या दहा ते वीस हजार असताना देखील या ठिकाणी बस स्टॉप मंजूर झालेला असून बसेस थांबत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

           यासंदर्भात ग्रामस्थांनी भाजपा कामगार मोर्चाचे सरचिटणीस अंकुश नंदवाळकर यांच्या नेतृत्वाखाली दि. 4 जून रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन बाळापुर उपनगर या ठिकाणी सर्व जलद अति जलद लोकल बसेस थांबणे, बाळापुर उपनगर हे नाव एबिक्स एटीएम प्रणालीत समाविष्ट करावे, बाळापुर उपनगर या नावाचे सर्व विभागातील आगारांच्या मशीन मध्ये नाव समाविष्ट करून बाळापुर उपनगर हे तिकीट देण्यात यावे, तसेच जोपर्यंत बसेस थांबत नाहीत तोपर्यंत महामंडळ चा कंट्रोलरची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन दिले असता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ मुंबई डीएम विभागाला आदेश दिले.

           यावेळी भाजपा कामगार मोर्चाचे सरचिटणीस अंकुश गोकुळ नंदवाळकर, विजय पवार प्रदेश उपाध्यक्ष कामगार मोर्चा, देविदास मिस्तरी जिल्हा उपाध्यक्ष कामगार मोर्चा, दिलीप समीर उत्तर महाराष्ट्र प्रदेश सचिव कामगार मोर्चा, जयेश माळी व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)