धुळे पोलीसांनी केलेल्या एकतर्फी कारवाईची चौकशी करुन दोषी अधिकार्यांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करा -
शिवसेना उबाठा वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे यांना निवेदन
धुळे - दि 4/6/2025 रोजी सायं. 7 ते 8 वाजता श्रीमती पद्मा किसन शिंदे (वय 43), व्यवसाय- शिक्षिका रा.जयहिंद कॉलनी, देवपूर धुळे या जयहिंद कॉलनीतील स्टेट बँक शाखेत गोल्ड लोन संबंधित पैसे भरण्यासाठी गेल्या असता तेथील मॅनेजर अतुल गांधी व सदाशिव अजगे यांनी त्यांना घरी जायची घाई असल्याने त्यांनी पैसे भरुन घेण्यास टाळाटाळ केली. श्रीमती शिंदे यांनी यापूर्वी अनेकदा 7-8 वा. व्यवहार केले आहे असे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असता मॅनेजर अतुल गांधी यांनी अत्यंत असभ्य, अश्लिल भाषेत चिडून तुम मराठी लोग कभी मुँह उठाके चले आते हो... और मेरे से मराठी में बात मत करो.. मेरे को मराठी समझ नही आती. असे तावातावाने बोलू लागले. शिंदे यांनीही त्यांच्याशी वाद घातला. तेव्हा त्याने तुम मराठी लोग चोर हो, यहाँ चोरी करने आयी हो असे म्हणत गुजराथी भाषेत अश्लील हावभाव करत गुजराथी भाषेत घाण बोलला. माझ्या मातृत्वाचा अपमान केला, मी एकटी आहे असे बघून माझ्या एकटेपणाचा तसेच माझ्या सोबत कोणी नाही हे बघुन घाणेरडे हावभाव केले. मला प्रचंड अपमानीत केले. माझा स्वाभिमान दुखावला. अतुंल गांधी यांनी मराठी भाषेचा, प्रांताचा अपमान केला. मला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सदाशिव अजगे त्यांच्या मदतीला धावून येत माझा हात धरुन ढकलले व त्यांनीही शिवीगाळ केली. म्हणून त्यांच्याविरुध्द दि. 4/6/2025 रोजी मी गुन्हा दाखल करण्यास गेली. परंतु घडलेल्या घटने प्रमाणे गुन्हा नोंद न करता साधी एनसी दाखल केली. परंतु माझे मुळीच समाधान झाले नाही. मी प्रचंड मानसिक तणावाखाली आले. कारण एवढे गंभीर प्रकरण घडले असतांना मला न्याय मिळत नव्हता. ती प्रचंड बेचैन झाले. मुळात धुळ्यात मी माझ्या 9 वर्षांच्या मुलासह एकटी राहते. माझे जवळचे कोणी नाही. म्हणून मी शिवसेना (उबाठा) पक्षाकडे न्याय मिळवून द्यावा म्हणून विनंती केली. अशा आशयाचे निवेदन शिवसेना उपनेते सौ शुभांगी पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, तक्रारदार प्रा.सौ . पद्मा शिंदे यांनी नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची नासिक येथे पोलीस महानिरीक्षक कार्यालयात भेट घेऊन दिले. सदर निवेदनात नमूद केले आहे की
दि.9/6/2025 रोजी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी स्टेट बँक शाखेत आंदोलन केले. कारण सदर महिलेशी अत्यंत असभ्य वर्तन त्यांनी केले होते. भाषिक, प्रांतिक मुद्दा उपस्थित करुन भारतीय राज्य घटनेचा अपमान केला. आंदोलन केल्यानंतर शिवसेना पदाधिकार्यांनी देवपूर पोलीस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दाखल करण्यासाठी घेवून गेले. परंतु बँक कर्मचारी देखील आमच्या विरुध्द मोठ्या संख्येने पोलिसावर अक्षरश: प्रचंड दबाव निर्माण करुन शिवसेना पदाधिकारी व माझ्याविरुध्द आयपीसी कलम 353 अन्वये गुन्हा दाखल केला.
त्याचवेळी श्रीमती शिंदे यांची देखील फिर्याद नोंदवून घेतली. त्यानुसार अतुल गांधी व सदाशिव अजगे विरुध्द बीएनएस 352, 351, 2 व 3, 79 अन्वये गुन्हा दाखल झाला.
मात्र बँक कर्मचार्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्याचे समजताच 100-150 बँक कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये जमले. अनेक बँक अधिकारी पी.आय. धनंजय पाटील यांच्या कार्यालयात येवून सरळ सरळ त्यांना भेटून गुप्त चर्चा करत होते. सदाशिव अजगे विरुध्द गुन्हा दाखल झालेला असतांना तो दिवसभर तसेच दुसर्या दिवशी (दि. 10/6/2025) देखील पोलीस स्टेशनमध्ये हजर असतांना त्यांच्यावर नियमाप्रमाणे अटकेची कारवाई केली नाही. शिवसेनेचे श्री.नरेंद्र परदेशी व श्री.धिरज पाटील यांना मात्र पी.आय. धनंजय पाटील यांनी आपण येथुन जावू नये, असे दुपारी 3 वाजेपासून बजावले. आम्ही सर्वांनी पोलिसांना तपासकामी सहकार्य केले असतांना सुध्दा पोलीस अधिकार्यांचा अवमान होवू नये म्हणून थांबून राहिलो आणि कुठलाही तपास न करता पी.आय. धनंजय पाटील यांनी श्री.नरेंद्र परदेशी, श्री.धिरज पाटील यांना अटक केली.
त्यावेळी सर्व पदाधिकार्यांनी पी.आय. धनंजय पाटील यांना अत्यंत शांततेने, नम्रतापूर्वक सांगितले की, ज्याप्रमाणे आम्हाला अटक केली. त्यापेक्षा सदाशिव अजगे यांचा गुन्हा गंभीर आहे. त्यांनी एका महिलेचा विनयभंग केला आहे. आपण त्यांनाही अटक करा. तेव्हा पीआय पाटील यांनी अत्यंत उर्मटपणे व बेजबाबदारपणे ङ्गआम्हाला कायदा शिकवू नका... त्यांच्याविरुध्द पुरावा मिळाला की, अटक करु. असा पक्षपात करुन... कायदा सर्वांसाठी समान हे घटनेच्या तत्वाला हरताळ फासला.
म्हणून आरोपी पोलीस स्टेशनमध्ये 2 दिवस हजर असतांना... (पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्हीमध्ये त्याबद्दलचे पुरावे उपलब्ध आहेत.) एका महिलेचा प्रचंड अपमान करणारा, अश्लील वर्तन करणारा, विनयभंग करणारा... भाषिक, प्रांतिकचा मुद्दा उपस्थित करणार्या... घटनेचा अपमान करणार्या आरोपीस पी.आय. धनंजय पाटील यांनी राजकीय व आर्थिक दबावास बळी पडून कर्तव्यात कसुर केली आहे. कारण सदाशिव अजगे हा आमच्या सर्वांच्या समक्ष पोलीस स्टेशनमध्ये माझ्यासाठी एक नव्हे तर दोन दोन मंत्र्यांचे फोन येतील. माझी काय ताकद आहे हे तुम्हाला कळेल. असा दम भरत होता. याचे चित्रण देखील सीसीटीव्ही फुटेममधुन तपासण्यात यावे. या दबावाला बळी पडून पो.नि. धनंजय पाटील यांनी अधिकाराचा दुरुपयोग केला आहे. तसेच सदर बँकेचा मी खातेदार आहे. मी त्यांना नाही तर काय तुम्हाला मदत करु का ? असा उलट उर्मट प्रश्न केला.
म्हणून पीआय. धनंजय पाटील यांच्याविरुध्द शिस्तभंग व कायदेशीर कठोर कारवाई करावी, त्यांची विभागीय चौकशी लावण्यात यावी अशा आशा याचे निवेदन पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना दिले .याप्रसंगी पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या सौ शुभांगी पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महिला आघाडीच्या डॉ.जयश्री वानखेडे, सौ.अरुणा मोरे, तक्रारदार प्रा. पद्मा शिंदे उपमहानगर प्रमुख अण्णा फुलपगारे ,शिवाजी शिरसाळे, आनंद जावडेकर, सलीम लंबू, सचिन रुणवाल, विष्णू जावडेकर, पिंटू ठाकूर, मनीष थोरात आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

