धुळ्यात राजकीय भूकंप माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस उध्वस्त होण्याच्या मार्गावर

0

धुळ्यात राजकीय भूकंप माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस उध्वस्त होण्याच्या मार्गावर

 १ जुलै रोजी मुंबई येथे कुणाल बाबा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपयी होणार 


जनसंघर्ष न्यूज 

धुळे  :- शहरात दिनांक एक जुलै रोजी माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या भाजपात प्रवेशाने शहरात मोठा राजकीय भूकंप होणार असून या भूकंपात काँग्रेस उध्वस्त होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. 

           गेल्या अनेक वर्षापासून वडिलोपार्जित धुळे ग्रामीण मध्ये काँग्रेस चा बालेकिल्ला उभा करणारे कालकथित माजी मंत्री रोहिदास दाजी पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार कुणाल बाबा पाटील हे मोदी लाटेत सुद्धा हार न मानता माझा हात काँग्रेसच्या हातात अशी भूमिका घेत काँग्रेस पक्षाकडून दोन वेळा आमदार म्हणून निवडून काँग्रेसचा बालेकिल्ला सांभाळणारे व्यक्तिमत्व कुणाल बाबा यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या भाजपा प्रवेशाचे चर्चांना उधाण आले होते. कुणाल बाबा यांनी सत्तेच्या परिघात रहावे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला असता त्या अनुषंगाने कुणाल बाबा यांनी दोन दिवसापूर्वी देवपुरातील त्यांच्या निवासस्थानासमोरील सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली व या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना आमदार कुणाल बाबांनी जाणून घेतल्या होत्या.

        यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत कुणाल बाबा हाच आमचा पक्ष त्यामुळे बाबा जिथे तिथे आम्ही अशी भूमिका समस्त कार्यकर्त्यांनी घेतली. सर कुणाल बाबांनी भाजपातच प्रवेश घ्यावा अशी आग्रही भूमिका देखील काही कार्यकर्त्यांनी मांडली असता कार्यकर्त्यांच्या म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कुणाल बाबा यांनी कार्यकर्त्यांचा मान राखत कार्यकर्त्यांना विचार करण्यासाठी वेळ मागून मी अंतर्मनाचा आवाज ऐकूनच निर्णय घेणार असे सांगत कार्यकर्त्यांना भाजप प्रवेशाबाबत संस्पेन्स कायम ठेवला होता.        

         पण आज कुणाल बाबा यांनी भाजपा प्रवेश बाबत तारीख जाहीर केल्यानंतर कुणाल बाबाच्या समर्थनार्थ शेकडो वाहनांनी कार्यकर्त्यांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या देखील अजून शेकडो कार्यकर्ते मुंबईला जाणार असून उद्या देखील असेच परिस्थिती राहणार आहे प्रचंड शक्ती प्रदर्शन करत माजी आमदार कुणाल बाबा हे भाजपा प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याने धुळे जिल्ह्यात काँग्रेस उध्वस्त होऊन, धुळे ग्रामीण मध्ये भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार हे निश्चित झाले आहे. 

           धुळे ग्रामीण मध्ये पाणीदार आमदार म्हणून माजी आमदार कुणाल बाबा ची ताकद मोठ्या प्रमाणात असून कुणाल बाबा यांची धुळे शहर जिल्हा व तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती स्थळे आहेत या शक्ती स्थळांमुळे भाजपाला जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये नक्कीच लाभ पहायला मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)