आदिवासी विकास विभागाचा गजब कारभार ; रजिस्टर वर विद्यार्थी भरमसाठ शाळेत मात्र शुकशुकाट
आदिवासी बचाव अभियानचे गणेश गावित यांनी केला पर्दाफाश
जन संघर्ष न्यूज
धुळे :- दिनांक 16/06/2025 रोजी संपुर्ण महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणा-या शासकीय आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळा मध्ये गाजावाजा करत प्रवेश महोत्सव साजरी करण्यात आला. एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी शाळा पातळीवर आटापिटा केल्या निवासी आश्रम शाळेत अजुन ही विद्यार्थी आले नाही. काही अनुदानित आश्रम शाळा बंद अवस्थेत आहेत. महिनाभर ही विद्यार्थी आले नाही तरी अनुदान कमी होणार नाही. शासकीय आश्रम शाळेत काही वर्गात शिक्षकच नाही तर विद्यार्थी शिक्षणाचे धडे कधी शिकतील. शासन म्हणत आम्हांला गुणवंत शिक्षक भरायचे आहेत तो पर्यंत आमच्या मुलांनी वर्गात बसुन दिवस मोजायचे का ❓आश्रम शाळेत कोण किती कसा काम करतो हे सगळ्यांना माहीत आहे. 100℅ निकाल लागल्यावर ही मंत्री महोदय म्हणतात. आमच्या मुलांची गुणवत्ता दिसुन येत नाही. मग आदिवासी मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष देणारे आदिवासी आश्रम शाळा व नामांकित शाळा जिथे आदिवासी विद्यार्थी शिकतात तिथे शाळा प्रवेश उत्सव साजरे करणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य तत्पर आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी नगर जिल्ह्यातील नामांकित शाळा संत ज्ञानेश्वर इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा दहाव्या वर्गाचा 2025 चा निकाल राजूरच्या प्रकल्प अधिकाऱ्याने माननीय मंत्री महोदयांना कळवला नाही, असे वाटते..!
या नेवासा तालुक्यातील भानस हिवरे या गावातल्या या नामांकित शाळेत दहाव्या वर्गाच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या व तेथेच शिक्षण घेतलेल्या 117 आदिवासी विद्यार्थ्यांपैकी 114 विद्यार्थी 2025 च्या परीक्षेत नापास झाल्याची बातमी नापास झाल्याची माहिती मिळाली.
यावर आदिवासी विकास मंत्री महोदय काही कार्यवाही करणार का ? शासकीय आश्रम शाळेची गुणवत्ता ढासाळलेली दिसते मग नामांकित शाळेची गुणवत्ता का दिसत नाही. असे अनेक समस्या असतांना आदिवासी विद्यार्थ्यांचा शोषण करणारे मंत्री पासुन अधिकारी ते कर्मचारी करत आहेत. प्रवेश महोत्सव खुप उत्सवात साजरी केला. आज शाळा सुरू होऊन 10/11 दिवस झाले.काही वर्गात शिक्षक विना विद्यार्थ्यांना वर्गात बसावे लागत आहे. एक ही लोक प्रतिनिधी अथवा पालक जाब विचारायला तयार नाहीत. ही खुप मोठी शोकांतिका आहे. मंत्री महोदयांना विद्यार्थ्यांची काळजी असती तर पहिल्या दिवसापासून शिक्षक रोजंदारी का होईना हजर केले असते. होणा-या विद्यार्थ्यांच्या नुकसानास जबाबदार कोण आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळा-या आदिवासी विकास विभागाचा व मंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत चालविल्या जाणा-या शासकीय आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळेत 16/17 दिवस शाळा सुरु झाले तरी विद्यार्थी शाळेत निवासी राहायला आले नाही.प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास विभागातील अधिकारी शांत बसुन आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहेत.

