अचल बंबचा सावकारी परवाना रद्द करून चौकशी करा- जयेश दुसाणे

0

 

अवैद्य सावकारी प्रकरणातील राजेंद्र बंबच्या मुलाला सावकारी परवाना मिळतोच कसा

अचल बंबचा सावकारी परवाना त्वरित रद्द करून चौकशी करा- जयेश दुसाणे

जनसंघर्ष न्यूज 

          धुळे :-  अवैध सावकारी प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी राजेंद्र बंब यांचा मुलगा अचल बंब यास डीडीआर यांनी दिलेल्या सावकारी परवाना तत्काळ रद्द करीत चौकशी करावी, अशी मागणी अवैध सावकारी प्रकरणातील मुळे फिर्यादी जयेश दुसाणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

           शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद झाली. दुसाणे यांनी सांगितले की, राजेंद्र बंद यांच्या अवैध सावकारीप्रकरणाचा तत्कालिन पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी योग्य तो तपास केला. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही. उलट या गुन्ह्यात जमा असलेल्या मालमत्तांची मोठी टक्केवारी देवून परस्पर खरेदी-विक्री झाल्याचा आरोपही दुसाणे यांनी केला. तसेच अवैध सावकारी प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी असलेल्या राजेंद्र बंब यांच्या मुलाला डीडीआर यांनी सावकारीचे लायसन्स दिले. ते रद्द करून याप्रकाराची चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी दुसाणे यांनी केली. सरकारी वकील, तपासाधिकारी सहकार्य करीत नसल्याचा आरोपीही त्यांनी केला.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)