
अनधिकृत शाळा चालकांचे धाबे दणाणले
अनधिकृत शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांवर अखेर गुन्हा दाखल
नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित सुरू असलेल्या सर्व शाळांच्या चौकशी होणार
जनसंघर्ष न्यूज
नाशिक - येथील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील लासलगाव नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित बी आय शेख उर्दू प्राथमिक शाळा अनधिकृत चालविणाऱ्या संस्था चालक हारूण बाबूलाल शेख सह अन्य साथीदारांवर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बातमीने महाराष्ट्रातील अनधिकृत रित्या शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्रांद्वारे शाळा सुरू करून शासनाची लूट सुरू असल्याचे उघडकीस येत असते. तसेच एक धक्कादायक लासलगाव नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित बी आय शेख उर्दू प्राथमिक शाळेचा प्रकार समोर आला आहे . या शाळेच्या संस्थाचालकांनी बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची कुठलीही परवानगी न घेता शाळा सुरू करून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या संस्थेच्या सुरू असलेल्या मालेगाव, शहादा देखील या प्रकरणात समाविष्ट असून त्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक अनधिकृत संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.
सविस्तर माहिती अशी की नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील लासलगाव येथे लासलगाव नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचालित आयुष्य प्राथमिक शाळा ही अनेक दिवसापासून अनधिकृत पणे चालवली जात होती या संदर्भात लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते युनूस रमजू तांबोळी यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केल्या होत्या त्यानुसार शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमून संबंधित शाळेची व तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची चौकशी करत समितीने सादर केलेल्या अहवालानुसार बनवलेल्या नित्कर्षानुसार सध्या स्थितीत ही शाळा अनधिकृत सुरू असल्याचे निदर्शनात आले असता सदर संस्था चालकाने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम 2009 चे कलम 18 (5) अंतर्गत उल्लंघन केले असल्याचे समोर आले असता शासनाची फसवणूक करून अनधिकृत शाळा सुरू केल्या प्रकरणी संबंधित शाळा व शाळा व्यवस्थापन यांच्याविरुद्ध नजीकच्या पोलीस स्टेशन येथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन बच्छाव यांनी निफाड येथील गट शिक्षणाधिकार्यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 27 जून रोजी निफाड चे गटशिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड यांनी समक्ष लासलगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन शिक्षण अधिकारी प्रशांत बच्छाव यांच्या आदेशानुसार लासलगाव नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचालित बी आय शेख उर्दू प्राथमिक शाळेचे अध्यक्ष हारून बाबूलाल शेख सह संस्थाचालक मंडळ यांच्यावर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियम कलम 18(5) ,18(1) , 318(4) ,3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
