
आझाद नगर पोलीस स्टेशनची दमदार कारवाई दुकानात दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोराला 3 तासांतच अटक
जन संघर्ष न्यूज
धुळे :- दि.29 जुन रोजी भगवा चौकातील गायकवाड कॉम्प्लेक्स मधील योगीराज ग्राफिक्स नावाचे दुकान रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने शटर चे कुलूप तोडून दुकानातील टेबलच्या ड्रॉवर मधून दहा हजार रुपये रोख रक्कम चोरी केली होती.
सविस्तर माहिती अशी की 29 जुन रोजी रविवार असल्याने दुपारी 1 वाजता दुकान मालक जयेश गणेश सोनार दुकान बंद करून दिनांक 30 जून रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना त्यांचे योगीराज ग्राफिक्स नावाचे दुकानाच्या शटर चे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले त्यांनी आत जाऊन बघितले तर दुकानातील टेबलाच्या ड्रॉवर उघडलेला दिसला व त्यातील दहा हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेलेली असल्याचे समजल्याने त्यांनी तात्काळ आझाद नगर पोलीस स्टेशन येथे जाऊन भारतीय न्यायसंहिता कलम 305, 331 (4), 324 (4) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या अनुषंगाने आझाद नगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी शोध पथकातील अमलदार यांना सदर गुन्ह्यातील दिलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी आदेश दिले असता त्यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असलेल्या ईसामाबाबत गोपनीय माहिती दारा मार्फत माहिती काढली असता सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असलेल्या इसम याचे नाव सद्याम रशीद शेख उर्फ बोबड्या दादा राणा राज्यात नगर वडजाई रोड धुळे हा असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाल्याने हा इसम सध्या बेवारस स्थितीत 80 फुटी रोड हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत राहत असल्याची माहिती मिळतात शोध पथकातील आमदार यांनी पंचायत समक्ष त्याचे अंग जळती घेतली असता गुन्ह्यातील रकमेपैकी 5000 रोख ज्यात पाचशे रुपये दरांच्या नोटा खिशात मिळून आल्या. सदर आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आझाद नगर पोलीस स्टेशन च्या पथकाने अवघ्या 3 तासांतच गुन्ह्याचा तपास लावून आरोपीस अटक केल्याने आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सह त्यांच्या पथकाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे , अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपाधीक्षक राजकुमार उपासे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार हजार नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोसई . समाधान सुरवाडे त्यांच्या पथकातील पोहेकाॅ. गौतम सपकाळे, योगेश शिरसाट, संदीप कढरे, शांतीलाल सोनवणे, रफिक पठाण, मनोज बागुल, विजय शिरसाठ, अनिल शिंपी, मक्सूद पठाण, पंकज जोंधळे यांनी केली आहे.
