मा. आमदार कुणाल बाबा पाटील यांचा काँग्रेस सह शिवसेना उबाठाला देखील मोठा धक्का

0




मा. आमदार कुणाल बाबा पाटील यांचा काँग्रेस सह शिवसेना उबाठाला देखील मोठा धक्का 

कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ललित माळी आणि हरीश माळी भारतीय जनता पक्षात…!

जनसंघर्ष न्यूज 

          धुळे :- शहराच्या राजकारणात 1 जुलै रोजी मोठी राजकीय खळबळ उडवणारी घटना घडली. खान्देशाचे लोकप्रिय नेते, माजी आमदार मा. कुणालजी पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील दोन महत्वाचे पदाधिकारी — विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी आणि जिल्हा युवा सेनाप्रमुख हरीश माळी यांनी थेट भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

          या ऐतिहासिक प्रवेश प्रसंगी, माजी आमदार कुणाल पाटील यांनी ललित माळी आणि हरीश माळी यांचे स्वागत करत, "धुळेच्या विकासासाठी आणि तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी हे नेतृत्व भाजपात आले आहे. भारतीय जनता पक्ष ही विकासाची आणि जनतेच्या हिताची चळवळ आहे. धुळेकरांच्या भविष्याचा विचार करणारे सर्वजण या प्रवाहात सामील होत आहेत, ही आनंदाची बाब आहे," असे सांगितले.

           प्रवेश सोहळ्यास मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण,महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री मा. जयकुमार रावल,आमदार भय्यासो अनुपजी आग्रवाल,आमदार रामभैय्या भदाणे,जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपलकर,प्रदेश ओबीसी   उपाध्यक्ष अविनाश माळी,माजी महापौर चंद्रकांत सोनार,माजी महापौर प्रदीपनाना करपे,माजी महापौर जयश्रीताई अहिराव,प्रदेश सरचिटणीस डॉ सुशील महाजन,नेते संजयजी बोरसे यांचीही उपस्थिती होती.

         ललित माळी यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले,चांगले काम करणाऱ्या लोकांसोबत बसून धुळेचा विकास होणार आहे.आम्हाला काम करायचं आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला."

         हरीश माळी यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितले, "तरुणांचा आवाज कोणी दाबू शकत नाही. भाजपाच्या माध्यमातून आम्ही धुळेकरांच्या न्यायासाठी आणि विकासासाठी मैदानात उतरलो आहोत."

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)