स्वस्तिक चित्रपटगृहाचे कागदपत्रे फेरफार प्रकरणी भुमापनच्या अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेचा दणका

0



स्वस्तिक चित्रपटगृहाचे कागदपत्रे फेरफार प्रकरणी भुमापनच्या अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेचा दणका

बनावट कागदपत्रां द्वारे खरेदी विक्री प्रकरणी नगर भूमापन कार्यालयातील 4 अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- शहरातील स्वस्तिक चित्रपट गृहाची जमीन हडपलेल्या भूमाफीयांचे सध्या महाराष्ट्र गाजत असलेल्या प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेने स्वस्तिक चित्रपट गृहाची जमीन बनावट कागदपत्राद्वारे खरेदी विक्री केल्याप्रकरणी नगर भूमापन कार्यालयातील चार अधिकाऱ्यांना अटक केली असल्याने खडबड उडाली आहे. चौकशी अजून कोणा कोणाचे नाव समोर येणार याकडे धुळेकरांचे लक्ष लागून आहे. 

           सविस्तर वृत्त असे की धुळे शहरातील स्वस्तिक चित्रपट गृह हे रेखा शहा व इतर काही जणांच्या मालकीचे असताना, भूमाफिया आरोपींनी सिटीसर्वे कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संगणमत करत बनावट कागदपत्रे तयार करून त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वस्तिक चित्रपट गृहाची बेकायदेशीर विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

         याप्रकरणी भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत जमीन बनावट कागदपत्राद्वारे खरेदी विक्री केल्याप्रकरणी कार्यालयातील चार प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. 

         सदर आरोपींनी सिटी सर्वे मालमत्तेच्या पत्रकावर हिरालाल मोतीलाल शाह यांच्या नावाभोवती असलेला कंस काढून 'कारणापुरता उतारा'प्रदीप हिरालाल शहा यांना दिला होता, या उताराच्या आधारे प्रदीप हिरालाल शहा यांचा मालमत्तेवर कोणताही हक्क नसताना त्यांनी वारसांची बेकायदेशीरपणे नोंद करून घेतली होती. 

       याप्रकरणी स्वस्तिक चित्रपट गृहाचे मूळ मालक रेखा शहा यांना सदर घटना समजल्यानंतर त्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात 1 मे रोजी भादवी कलम 420, 465, असे 67 468, 471, 167, 197, 198,120 (ब), 34 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. 

        सदर घटनेचा गांभीर्य घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाईचे आदेश दिले असता आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या नेतृत्वात सदर घटनेची सखोल चौकशी करून घटनेचा तपास लावून उपनिरीक्षक अमोल देवडे सविता गवांदे पोहवा रवींद्र माळी श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाणे गणेश खैरनार विलास पाटील यांनी बनावट नकाशा तयार करणारे आणि बनावट मालमत्ता पत्रके देणारे नगर भूमापन कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर आनंद दिगंबर मोरे ( सध्या नेमणूक भूमी अभिलेख कार्यालय तळोदा जिल्हा नंदुरबार) , नगर भूमापक धर्मेंद्र प्रभाकर खंबाईत ( सध्या नेमणूक  धुळे प्रमुख लिपिक भूमापन कार्यालय ), देवेंद्र सदाशिव टोपे ( सध्या नेमणूक धुळे नगर भूमापन लिपिक ) , धीरज रमेश बोरसे सध्या नेमणूक धुळे या चौघांना बेड्या ठोकल्या असून अटक करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)