अट्टल बुलेट चोर बुलेट राजा त्याला स्थानिक गुन्हे शाखेची सजा

0

       



अट्टल बुलेट चोर बुलेट राजा त्याला स्थानिक गुन्हे शाखेची सजा 

विविध जिल्ह्यातून चोरी केलेल्या 14 बुलेट असतात करून अट्टल चोरांना अटक

जनसंघर्ष न्यूज 

          धुळे :- जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्यामुळे अट्टल चोरांना शोधून अद्दल घडविण्यासाठी मोटर सायकल चोरी बाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पेशल कॉम्बिन ऑपरेशन राबवण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार यांचे पथक तयार करून रवाना केले असता पथकातील राहुल गिरी व कमलेश सूर्यवंशी हे गोपने माहिती घेण्यासाठी फिरत असताना यांना माहिती मिळाली होती एक इसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरत आहे याप्रमाणे त्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने त्याच्याजवळ असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्यांनी सांगितले त्याला पुन्हा विश्वासात घेत विचारपूस केली असता त्यांने सांगितले की मी व माझ्या साथीदार सह आम्ही नाशिक , पिंपळगाव, शिर्डी, पुणे या ठिकाणाहून एकूण 14 बुलेट चोरी केल्याची कबुली दिली आहे. 

          तसेच हे दोघे आरोपी फक्त बुलेट चोरीमध्येच माहित आहेत तपासामध्ये निष्पन्न झाले असून यात मुख्य आरोपी हर्षवर्धन गोकुळ जगदाळे रा. खर्दे ता. शिरपूर तसेच त्याच्या साथीदार किरण सुरेश कोळी रा.खर्दे ता.शिरपूर यांना अटक करून त्यांच्याकडून 14 बुलेट हस्तगत करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

        सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे , अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, असई संजय पाटील, पोहेकाॅ. प्रशांत चौधरी, पोकाॅ. राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जगदीश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, गुलाब पाटील यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)