मुलाने घराबाहेर काढले… पण एका अनोळखी व्यक्तीने दिला जीवनाला आधार !
पोटच्या मुलानी वडिलांना घराबाहेर काढलं…पण समाजसेवक प्रदिप नन्नवरे यांनी दिला वृद्ध आजोबांना आधार
जनसंघर्ष न्यूज
परभणी :- जिल्ह्यातील पूर्णा शहरात हिंगोली जिल्ह्यातील देवठाणा फाळेगाव येथील बाबुराव निवृत्ती मोरे हे वृद्ध आजोबा पूर्णा शहरातील शेख समी यांच्या घराजवळ एकटे, उपाशीपोटी बसलेले आढळून आले.
शेख समी यांनी माणुसकी दाखवत त्यांना अन्न दिले व वृद्ध आजोबांना त्यांची सविस्तर माहिती विचारले असता. यावेळी आजोबांनी दुःखद कथन केले की, "माझ्या मुलाने – देवानंद मोरे (महिंद्रा कंपनी, सातपूर नाशिक येथे कार्यरत) – मला घरातून बाहेर हाकलून दिलं." हे ऐकून शेख समी यांनी तात्काळ सदैव गोर गरीब जनतेचा सेवेत असणारे समाजसेवक प्रदिप नन्नवरे यांनी आज पर्यंत बेघर लोकांची अंत्यविधी, व त्यांच्या घरी सुखरूप पाठवले तर काहींना आश्रम मध्ये सोडले असून यांना बोलावून घेतले. प्रदिप नन्नवरे यांनी क्षणाचाही विलंब न करता आजोबांना ग्रामीण रुग्णालय, पूर्णा येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांनी आजोबांना परभणी येथील 'सावली बेघर निवारा केंद्रात' सुरक्षित ठिकाणी पोहचवले.
या अजोबांच्या मुलाला चांगला धडा सामाजिक कार्यकर्त्यांनी शिकवला पाहिजे जेणेकरून असे प्रकरण कमी होतील समाजसेवक प्रदिप नन्नवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी युवराज गव्हाणे (संस्थापक अध्यक्ष), शेख समी, युवराज सूर्यतळ,वैभव गायकवाड आणि जाबाज खान यांनी सक्रिय सहभाग घेऊन मोलचे सहकार्य केले.
आजोबांची व्यथा ऐकून अनेकांचे डोळे पाणावले, पण समाजातील संवेदनशील व्यक्तींनी दाखवलेली माणुसकी हीच या घटनेतील खरी प्रेरणा ठरली. प्रदिप नन्नवरे यांनी दाखवलेले माणुसकीचे चित्र म्हणजेच आजच्या समाजातील खरा प्रकाशदूत!

