आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे व किरण गायकवाड यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
जनसंघर्ष न्यूज
उत्तर प्रदेशचे खासदार ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद साहेबराव लोंढे आणि समता समाज संघाचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा दिनांक 19 जुलै रोजी मुंबईत पार पडला. हा प्रवेश सोहळा शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या पुढाकारातून संपन्न झाला. या जाहीर प्रवेश सोहळ्यासाठी आनंद लोंढे व किरण गायकवाड हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाहनांच्या मोठ्या ताफ्याद्वारे मुंबईत दाखल झाले होते. लोंढे यांनी वडिल साहेबराव लोंढे यांचे आशीर्वाद घेऊन या प्रवेश सोहळ्याचा प्रवास सुरू केला. वाहनांचा मोठा ता फा लक्ष वेधून घेत होता. मुंबईत दाखल झाल्यावर आनंद लोंढे व गायकवाड यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भला मोठा गुलाब पुष्पांचा हार घालण्यात आला. जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी आनंद लोंढे आणि किरण गायकवाड यांचा सविस्तर परिचय ना. एकनाथ शिंदे यांना करून दिला. आनंद लोंढे यांच्या प्रवेशाने धुळे जिल्हा शिवसेनेची ताकद प्रचंड वाढणार आहे असेही महाले यांनी मुख्यमंत्र्यांच्या मनावर ठसविले. आनंद लोंढे यांनी धुळ्यातील विनोद वाईन शॉप हटविण्यासह त्यांच्या विविध प्रखर आंदोलनांविषयी देखील महाले यांनी शिंदे यांना माहिती दिली. एकनाथ शिंदे यांनी आनंद लोंढे यांच्या आजवरच्या कामगिरीची प्रशंसा केली. तसेच शिवसेनेत आपले पुढचे भविष्य उज्ज्वल असेल असे आश्वस्त केले. याप्रसंगी शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नूतन गवांदे, धुळे महिला जिल्हाध्यक्ष ज्योती रावत, भैय्या वाघ, शहर अध्यक्ष, रोहित सोनवणे, आबा निकुंबे, किरण भालेराव, स्वप्निल ढोडरे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आनंद लोंढे आणि किरण गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.

