सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे एक दिवसीय शिबिर संपन्न

0



सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे एक दिवसीय शिबिर संपन्न

 विद्रोहाचा एल्गार पेटवून सर्वंकष शोषणाच्या विरोधातील आवाज  विद्यार्थ्यांनी बुलंद करावा - ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते एस. यु.तायडे

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे :- सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे एकदिवशीय जिल्हा शिबिर देवपूरातील संत रविदास भवन येथे संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते एस. यु.तायडे यांनी केले यावेळी मंचावर तुषार सूर्यवंशी, कॉ. एल.आर.राव, कॉ.दत्ता थोरात,ज्वाला मोरे व सिद्धार्थ जगदेव उपस्थित होते.उद्घाटकीय भाषणात ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते एस. यु.तायडे यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत सरकार नवीन शैक्षणिक धोरण लादून दलित कष्टकरीवर्गाला शिक्षण क्षेत्राचतून हद्दपार करण्याचा कारस्थान करीतआहे.म्हणून विद्यार्थी वर्गाने सम्यक ज्ञान आत्मसात करून सर्वंकष शोषणाच्या विरोधातील आवाज  विद्यार्थ्यांनी बुलंद करावा असे मार्गदर्शन करण्यात आले.

      तसेच दुसऱ्या सत्रात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सचिव तुषार सुर्यवंशी यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची भूमिका विषद केली तर विजय वाघ यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे लढे यावर प्रकाश टाकला.राकेश अहिरे आणि प्रा.सतिष निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.भोजन अवकाशानंतर शंकर यशोद दिग्दर्शित "अ" ही शॉर्ट फिल्म दाखवून चर्चा करण्यात आली.समारोप सत्र सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सिद्धांत बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या सत्रात सिद्धार्थ जगदेव यांनी विद्यार्थी संघटना आणि मैत्रीभाव या विषयावर विचार मांडले.यावेळी प्रा.तथागत सुरवाडे उपस्थित होते.शिबिर यशस्वी करण्यासाठी सिद्धांत बागुल,हर्ष मोरे,विजय वाघ,केतन निकम,निलिमा भामरे,भूषण ब्राह्मणे,धनंजय जगताप,सिद्धार्थ बैसाने,सिद्धार्थ बागुल यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)