निराधार योजनेचे पैसे मिळत नसल्याने निराधार महिलांवर उपासमारीची वेळ

0

 


निराधार योजनेचे पैसे मिळत नसल्याने निराधार महिलांवर उपासमारीची वेळ

निराधार योजनेचा अर्ज २ वर्षे धूळखात ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रदिप नन्नवरे यांनी पुष्पहार घालून केला सत्कार

जनसंघर्ष न्यूज 

पूर्णा ( जि. परभणी ) :- गेल्या दोन वर्षांपासून विविध शासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या या निराधार योजनेसाठी लाभार्थी द्रुपद रामा मिटकर, सखुबाई राजाराम मांजरे, नारायण रामा मिटकर, यांचा निराधार योजनेसाठी दोन वर्षापासून अर्ज धूळखात तहसील कार्यालयात पडलेला असुन निराधार महिला योजनांच्या लाभाचे वितरण त्वरित करण्यात यावे, या मागणीसाठी युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला.

संबंधित विभागाचे कर्मचारी श्रीकांत कोकरे निराधार योजना डाटा एन्ट्री ऑपरेट यांनी दोन वर्षे अर्ज धुळखात ठेवला म्हणून त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करून सकारात्मक पद्धतीने काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. सुनील मगरे ,काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मा. प्रल्हाद पारवे तसेच परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगावे,सिद्धार्थ वाघमारे, समाधान वाघमारे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर उपक्रमात सहभागी महिलांनी त्यांच्या समस्या मांडतांना शासनदरबारी झालेल्या विलंबाबद्दल खंत व्यक्त केली. वास्तविक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणे हीच खरी प्रशासनाची जबाबदारी आहे , असे प्रदिप नन्नवरे यांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली. 

प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करत, समाजाभिमुख आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून या आंदोलनाचे रूपांतर जनसहभागातील सुसंवादात करण्यात आले,ही या उपक्रमाची विशेषता ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)