उज्वल टाटा मोटर्स व विमा कंपनी करतयं ग्राहकांची फसवणूक

0

 उज्वल टाटा मोटर्स व विमा कंपनी करतयं ग्राहकांची फसवणूक

न्यायालयासह ग्राहक मंचात दाद मागणार- मिलिंद बैसाणे

जनसंघर्ष न्यूज 

       धुळे : शहरातील उज्वल मोटर्ससह टाटा विमा कंपनीने आपली फसवणुक केली आहे. याबाबत उज्जव मोटर्सचे मालक, विमा कंपनीचे अधिकारी याच्याविरोधात न्यायालयासह ग्राहक मंचाकडे दाद मागणार असल्याची माहिती धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा पंचशिल मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मिलिंद बैसाणे यांनी पत्रपरिषदेत दिली.

       जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलतांना मिलिंद बैंसाणे यांनी सांगितले की, 15 ऑगस्ट 2024 रोजी पत्नी शोभा बैसाणे यांच्यासाठी टाटा टिगोर ही कार शहरातील उज्वल मोटर्स येथून घेतली. तेव्हाच कारचा (क्र.एमएच 18 सीई 1001) इन्शुरन्स देखील काढला होता. त्यामुळे कारचा अपघात झाल्यास, काही नुकसान झाल्यास विमा कंपनीने भरपाई दिली पाहिजे. नुकतेच कारचे हेड लॅम्प, साईड मिरर, स्क्रॅचेस व किरकोळ कलरींगचे काम करण्यासाठी कार उज्वल मोटर्स येथे दिली होती. यासाठी 12 ते 15 हजार खर्च व हे काम विम्यातून होणे आवश्यक होते. मात्र उज्वल मोटर्सने 16 हजाराचे बिल काढले. बिल दिल्याशिवाय कार देणार नाही, असे सांगितले. 

         त्यानंतर मिलिंद बैसाणे यांनी विम्याची माहिती घेतली असता उज्वल मोटर्सने विमा कंपनीकडून या कामासाठी 46 हजाराचे बिलं काढल्याचे कळले. त्यामुळे पैसे भरण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही वर्षभराचा विमा काढलेला  असल्याने आमच्या कारचे काम विम्यातुनच करून मिळावे, अशी आमची मागणी असल्याचे बैसाणे यांनी सांगितले. तसेच उज्वल मोटर्स येथे कार काही दुरूस्तीसाठी नेल्यास ते एक ते दीड महिना ठेवून घेतात. पार्ट शिल्लक नाही, अशी कारणे देतात. त्यामुळे आपण उज्वल मोटर्सचे मालक व विमा कंपनीच्या अधिकार्‍यांविरोधात न्यायालय व ग्राहक मंचात दाद मागणार असल्याचेही मिलिंद बैसाणे यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)