राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.खासदार सुनील तटकरे यांचा स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे दौरा संपन्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या कोणत्याच कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव केला जाणार नाही :- रा.काॅ.प. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहराच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे जल्लोषात स्वागत
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे धुळे शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे माजी मंत्री, आमदार मा. अनिलजी पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. इर्शाद भाई जहागिरदार यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष मा. कैलास भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात धुळे शहर मध्यवर्ती कार्यालय झाशी राणी पुतळा येथे ढोल ताश्याच्या गजरात, जेसीबी वरून फुलांची उधळण करीत असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषाच्या व उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले.
यानंतर मनभावन हॉल येथे धुळे शहर व जिल्हा कार्यकारणीची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. त्या ठिकाणी देखील मा. सुनीलजी तटकरे साहेबांचे मा. इर्शाद भाई जहागिरदार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहराचा कार्य अहवाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीचे कागतपत्र सुपूर्द करण्यात आले. धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तब्बल 20,009 सभासद नोंदणी करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली असताना अचानक नाराज पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला व जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात येत असल्याचे सांगितले असता सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हा दौरा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असून येणाऱ्या निवडणुकीत पक्ष मोठ्या संख्येने उमेदवार उभे करून निवडून आणणार असून येथे पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल व यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनीलजी तटकरे साहेब, माजी मंत्री आमदार अनिलजी पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली ताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज दादा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ भाई तांबोळी, सामाजिक प्रदेशाध्यक्ष सुनीलजी मगरे साहेब, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत दादा कदम, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या ताई सोनवणे, युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभिलाषा ताई रोकडे, तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते

