आषाढी एकादशीनिमित्त बाळापूर गावात विठ्ठल नामाची शाळा भरली

0

 


आषाढी एकादशीनिमित्त बाळापूर गावात विठ्ठल नामाची शाळा भरली

 अंबिशन किड्सच्या विद्यार्थ्यांनी  विठ्ठल रुक्माई व वारकऱ्यांची वेशभूषाने गावकऱ्यांचे वेधले लक्ष 

जनसंघर्ष न्यूज 

      धुळे :- आषाढी एकादशीनिमित्त बाळापुर उपनगरातील अंबिशन किड्स स्कुलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई व वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली. यावेळी ज्ञानोबा-माउली-तुकारामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.

       अंबिशन किड्स शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांचे अभंग, भक्ती गीते याप्रसंगी सादर केली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांची पालखी मिरवणूक दत्त मंदिर येथे नेण्यात आली. त्यावेळी मुलांच्या हातात भगवे ध्वज तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ, कपाळी गंध आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि ‘विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहानभूक हरली,’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी अंबिशन किड्स स्कूलमध्ये अवतरले होते. ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.या प्रसंगी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिपक वाघ सर सचिव आरती वाघ मॅडम व संचालक मंडळ तसेच शाळेतील शिक्षिका आरती वाघ मॅडम,  चंद्रकला वडिले मॅडम,सीमा खैरनार मॅडम, ऐश्वर्या  अहिरे, मॅडम,व कृष्णा पवार, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिक्षक व  अभंग मृदंग वाजवणारे बुधा शिरसाठ, प्रमोद पवार, हर्षल बडगुजर व  गावातील दत्तू आबा पाटील, वैभव निवृत्ती काळे व नागरिक   पालक वर्ग यांनी सहकार्य करून पुढाकार घेतला. यावेळी सुरेश महाराज यांनी विशेष सहकार्य केल्याने संस्थेचे अध्यक्ष दीपक वाघ यांनी त्यांचे आभार व्यक्त केले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)