दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी 31 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज सादर करावे

0

 


दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी 31 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज सादर करा

 जनसंघर्ष न्यूज 

धुळे ,दिनांक 5 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :- शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘टॉप क्लास शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ आणि ‘सक्षम शिष्यवृत्ती योजना पदविका / पदवीसाठी’ योजनेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोंबर, 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

        केंद्र शासनाच्या एनएसपी पोर्टलद्वारे दिव्यांगासाठी योजना राबविण्यात येते. राज्यात तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. टॉप क्लास शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना बाबत दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी https://depwd.gov.in/  या संकेतस्थळावर तसेच  सक्षम शिष्यवृत्ती योजना पदविका / पदवीसाठी शिष्यवृत्ती साठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  https://www.aicte.gov.in/   संकेतस्थळावर शिष्यवृत्तीबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

      शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी केंद्र शासनाचे एनएसपी पोर्टलवर https://scholarships.gov.in/Students दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वरील योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया जून पासून सुरु झाली आहे. या योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2025 आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री.पावरा यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)