अप्पर तहसील कार्यालयात महसूल सप्ताह निमित्त विविध उपक्रम उत्साहात साजरे

0

अप्पर तहसील कार्यालयात महसूल सप्ताह निमित्त विविध उपक्रम उत्साहात साजरे

जनसंघर्ष न्यूज 

  धुळे (जिमाका वृत्तसेवा) :-  महसूल सप्ताह 2025 अंतर्गत धुळे शहरातील अप्पर तहसिल कार्यालयामार्फत विविध उपक्रम उत्साहात साजरे करुन शहरात महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

  महसुल सप्ताहातंर्गत 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 चे कलम 155 अंतर्गत सहा लाभार्थ्यांना आदेशाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी  मंडळस्तरावर बाळापूर ते वडजाई सौंदाणे येथे पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. देवपूर येथील गट नंबर 46 वर म्हाडा आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमात देवपूर मंडळ भागात 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच वलवाडी येथील पाणंद व शिवरस्त्यांच्या दुतर्फाही वृक्षारोपण करण्यात आले. 

  तसेच 4 ऑगस्ट रोजी  नैसर्गिक आपत्तीत 11 पशुधनाची हानी झालेल्यांपैकी सहा पशुपालकांना आर्थिक नुकसानीच्या मदतीचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रातील 12 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरीत करण्यात आले.  महसूल दुत उपक्रमांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या 39 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

  महसूल सप्ताहानिमित्त आयेाजित कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, अपर तहलिसदार  वैशाली हिंगे, तहसिलदार (संजय गांधी योजना) हंसराज पाटील, नायब तहसीलदार अविनाश सोनकांबळे, नायब तहसीलदार बी. बी. पावरा, मंडळ अधिकारी श्री. बाविस्कर, दीपक महाले, मनोहर पाटील, तलाठी श्री. गायकवाड, श्री. पाटील, महसूल सहाय्यक किरण कांबळे, मगर नाना, उदय सुर्यवंशी, कोतवाल, पोलीस पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)