संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन आंबेडकरी चळवळ मजबूत करणार :- बिपिन अण्णासाहेब कटारे

0

 

संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन आंबेडकरी चळवळ मजबूत करणार 

बिपिन अण्णासाहेब कटारे युवा नेते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष

जनसंघर्ष न्यूज 

    नंदुरबार(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने नंदुरबार जिल्हा "कार्यकर्ता बैठक" व "भव्य प्रवेश सोहळा" आज नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला होता.

     या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य युवा नेतृत्व बिपिन कटारे हे होते. बिपिन कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. बैठकीचे आयोजन नंदुरबार जिल्हाध्यक्ष दिपकजी भालेराव व युवा जिल्हाध्यक्ष इम्तियाज भाई सैय्यदयांनी केले होते.

      बिपिन कटारे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले सांगितले की,

▪️देशात/राज्यात जातीय धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे.

▪️गरीब घटकांच्या दैनंदिन जीवनमरणाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नाही

▪️ महिलांवरील अत्याचार वाढत आहे

▪️दलित मागासवर्गीयांवरील होत असलेले हल्ले अत्याचार याने तर कहर केला आहे.

▪️महागाई/बेरोजगारीने येथील सर्वसामान्य घटक हातबल झाला आहे

▪️अवकाळी पावसामुळे शतकेरी व गरीब घटकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

     सरकारने नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्यावी अशी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे.

      राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी अभियान संपर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या वतीने राबविण्यात येत आहे, जेणेकरून गाव - शहर – तालुका – जिल्हा पातळीवरील नागरिकांशी संपर्क करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविली जाईल व आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सज्ज आहे असे शेवटी बिपिन अण्णासाहेब कटारे यांनी बोलतांना सांगितले.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात अत्यंत जोमाने सुरू आहे.

       स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात देखील लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रचंड जाहीर सभा आयोजित करणार असल्याचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष दिपकजी भालेराव यांनी सांगितले.

   सदर बैठकीला युवा जिल्हाध्यक्ष इम्तियाज भाई सैय्यद,नंदुरबार तालुकाध्यक्ष काकासाहेब पवार,संजय जावरे प्रसिद्धी प्रमुख,नंदुरबार जिल्हाउपाध्यक्ष दत्ता भाऊ शेळके,युवा उप जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ पवार,युवा तालुका अध्यक्ष काशिनाथ ठाकरे,नंदुरबार तालुका उपाध्यक्ष पुंडलिक दौलत पाटील,नंदुरबार तालुका महासचिव  मोहनसिंग गिरासे,नंदुरबार तालुका संघटक यादव ठाकरे,युवा तालुका उपाध्यक्ष रम्या ठाकरे,खामगाव अध्यक्ष उमेश पाडवी,सिद्धार्थ पवार उपतालुका अध्यक्ष,नाशिक नेते वाल्मीक भाऊ खरात आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)