शासकीय नोकरांवर हल्ला करणाऱ्या गौण खनिज माफीयांची टोळी धुळे जिल्ह्यातून तडीपार

0

 

शासकीय नोकरांवर हल्ला करणाऱ्या गौण खनिज माफीयांची टोळी धुळे जिल्ह्यातून तडीपार 

पश्चिम देवपूर पोलिसांच्या कारवाईने गौण खनिज व रेखी माफीयांचे धाबे दणाणले

जनसंघर्ष न्यूज 

    धुळे :- शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीत सन 2020 पासुन बेकायदेशिर संघटीत टोळी तयार करुन शासकीय सेवकावर हल्ला करणे (गौण खनिज वाळु चोरी करुन नेत असतांना वनरक्षक यांनी अडविल्याने धक्काबुक्की करुन दहशत निर्माण केली), गौण खनिज वाळु चोरी करुन वाहतुक करणे, आजन्म कारावासाची शिक्षा किंवा कैदेची शिक्षा असलेला अपराध करण्याचा प्रयत्न करणे, लोकसेवकास दुखापत करणे, शासकीय कामात हरकत घेणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी (1) नितिन रविंद्र पाटील, वय-30 वर्ष, रा. तिसगाव ता.जि. धुळे (टोळी प्रमुख) (2) समाधान देविदास पाटील, वय-37 वर्ष, रा. तिसगाव ता. जि.धुळे (टोळी सदस्य) व (3) दिपक छोटु पाटील, वय-22 वर्ष, रा.ढंढाणे ता.जि. धुळे (टोळी सदस्य) यांची एक टोळी होती. त्यांचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. क्र पो. ठाणे गु.र.नं. कलम 1) पश्चिम देवपूर 99/2020 भादंवि क. 353, 379, 511, 332, 186, 504, 506, 34. , 2) पश्चिम देवपूर NC 236/2020 भादंवि क.323, 504, 506, 34. , 3) पश्चिम देवपूर 39/2024 भादंवि क.379, 341, 34 सह महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 चे कलम 48, 48(7), 48(8).

       सदर टोळीकडुन धुळे शहर व तालुक्यातील नागरीकांचे जिवितास, मालमत्तेस भय व धोका निर्माण झालेला होता. त्यातुन सदर परिसरातील सुव्यवस्था बाधीत झाली होती. म्हणुन सपोनि. पश्चिम देवपूर पोलीस ठाणे यांनी मा. पोलीस अधीक्षक, धुळे यांचेकडे सदर आरोपींविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये धुळे जिल्हयातुन तडीपार करणेबाबत प्रस्ताव सादर केला होता.

       प्रस्तावाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक, श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांनी प्रस्तावाची छानणी केल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, धुळे यांचेकडे प्रस्ताव सादर केला. मा. पोलीस अधीक्षक, धुळे यांनी हद्दपार प्रकरणी सुनावणी करुन, नमुद तिनही आरोपीतांना सहा महिने कालावधीसाठी संपुर्ण धुळे जिल्हयाचे सरहद्दीतुन हद्दपार करण्यात आले आहे.

      सदर टोळीने मा. पोलीस अधीक्षक, धुळे अथवा महाराष्ट्र राष्ट्र शासनाची लेखी पुर्व परवानगी शिवाय प्रतिबंधित क्षेत्राच्या हद्दीत प्रवेश केल्यास अगर मिळुन आल्यास म.पो.का.क. 142 नुसार दोन वर्ष शिक्षा अगर दंडाचे अपराधास पात्र राहतील.

      सदर कारवाई श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजकुमार उपासे, उ.वि.पो.अ. धुळे शहर उपविभाग, धुळे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पश्चिम देवपूर पोलीस ठाणेचे सपोनि. सचिन कापडणीस /पोउनि. मनोज कचरे / पोलीस अंमलदार संतोष हिरे, हर्षल चौधरी, कबीर शेख व सनी सरदार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)