बेपत्ता मुलीचा शोध न लागल्यास स्वतंत्र दिनी पालकमंत्र्यांसमोर आत्मदहन करण्याचा पिडीतेच्या मातेचा इशारा

0

 

बेपत्ता मुलीचा शोध न लागल्यास स्वतंत्र दिनी पालकमंत्र्यांसमोर आत्मदहन करण्याचा पिडीतेच्या मातेचा इशारा 

जनसंघर्ष न्यूज 

धुळे : गरताड (ता. शिरपूर) येथील एका तरुणाने धुळे शहरातील अल्पवयीन युवतीला पळून नेले. यासंदर्भात तक्रार निवेदन देऊनही शिरपूर पोलीसानी कुठलीही कारवाई केलेली नाही असे देखील शितल पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 

धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले कि, त्यामुळे १५ ऑगस्टला पोलीस मैदानावर पालकमंत्र्यासमोर माझ्या वडिलांसह  आम्ही आत्मदहन करणार असल्याचा इशाराही पिडतेच्या आईने दिला.

   येथील ४२ वर्षीय महीलेने (रा. विजय पोलीस कॉलनी वाडीभोकर रोड, धुळे) माहीती दिली. त्यानुसार संशयित  विश्वजीत युवराज मोरे (रा.गरताड ता. शिरपूर) तक्रारदार महिलेच्या अल्पवयीन मुलीला पळवुन नेले. यापूर्वी निवेदन दिले होते, परंतु कुठलीही कारवाई झाली नाही.

१९ जुलैस पुन्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी धुळे, शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. परंतु अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही व मुलीचा शोध लागलेला नाही. मुलीच्या शिक्षणाचे व तिच्या भविष्याचे नुकसान संशयीतामुळे होत आहे.

आरोपीने मुलीला लपवून ठेवलेले आहे. त्याचे आईवडील मोकाटपणे वावरत आहेत. सामान्य कुटूबांच्या मुलीचा दोन ते तीन महिने झाले तरी तिचा तपास पोलीसांकडून लागत नाही.

 संशयिताच्या कुटुंबीयांची चौकशी करुन अटक का होत नाही, असा प्रश्नही उपस्थित केला. त्याला त्वरीत अटक करुन माझ्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन माझ्या ताब्यात द्यावी, या प्रकरणी कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी, अन्यथा येत्या १५ ऑगस्टला पोलीस मैदानावर पालकमंत्र्यासमोर माझ्या वडिलांसह  आम्ही आत्मदहन करणार असल्याचेही तक्रारदार महिलेने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)