दलवाडे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू, गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

0


 दलवाडे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू, गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 

जनसंघर्ष न्यूज 

 शिंदखेडा प्रतिनिधी 

      शिंदखेडा :- तालुक्यात असलेले दलवाडे प्र.न. गाव हे स्वातंत्र्य काळातील ऐतिहासिक गाव म्हणून ओळखले जाते या गावाला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा आहे परंतु गेल्या दशकांमध्ये या गावाचा विकास झालेला नाही परंतु विद्यमान सरपंच रजेसिंग प्रतापसिंग  गिरासे यांच्या मार्गदर्शनानुसार गावाचे राष्ट्रवादीचे जिल्हा युवा नेते दीपक गिरासे यांनी या त्यांच्या मूळ गावासाठी प्रशासनाकडे अनेक वेळेस गावाच्या विकासासाठी पाठपुरावा केलेत परंतु सध्या निधीचा अभावी त्यांना विकासाला पाहिजे तसा निधी मिळाला नाही म्हणून त्यांनी होईल तेवढ्या कमी निधीमध्ये काही बाकी वैयक्तिक खर्च करून गावात अनेक विकास काम सुरू केलेली आहेत व आज गावात विकासात भर पडलेला दिसत आहे हे सत्य कोणी टाळू शकत नाही.

        गावातील येणारे प्रमुख रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावे कारण गेल्या वीस वर्षापासून गावाचा प्रमुख रस्ता झालेला नव्हता व रस्ता अत्यंत खराब झालेला असताना गावातील लोकांना अनेक वर्ष जाता येताना त्रास सहन करावा लागला यासाठी दीपक गिरासे यांनी मनात खंत व्यक्त करत गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी दोंडाईचा शिंदखेडा राज्य महामार्गावर तीन तास रास्ता रोको करून मोठे आंदोलन घेतले होते राज्य महामार्गावर त्यांनी व त्यांचे गावातील काही सहकाऱ्यांनी रास्ता रोको करून प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष केंद्रित केले होते त्यामुळे आज ते प्रमुख रस्त्यांना जिल्हा प्रशासनाकडून 54 लाखाचा निधी मिळाला त्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभारही व्यक्त केले आहेत.  दिलेल्या निधीला  प्रशासकीय मान्यतेनुसार  कार्यरंभ आदेश दिले,  परंतु त्या रस्त्याचे काम टेंडर पद्धतीने अमृत पाटील या ठेकेदाराकडे गेले सदर ठेकेदाराने ते काम दुसऱ्याकडे विकले आणि आज त्या रस्त्याचे काम सुरू केले आहे, परंतु रस्त्यावरची जुनी खळी काढून तीच खळी पुन्हा पसरवली जात आहे सदर अंदाजपत्रकामध्ये सर्वच खळी ही चांगल्या दर्जाची नवी आणून वापरायची तरतूद केली आहे तरी देखील सदर ठेकेदार हा मनमानी करत त्याच रस्त्याचे जुनी खळी काढून तीच पुन्हा वापरत आहे  व थोडी फार दाखवण्यासाठी नवी खळी मागवण्यात आली आहे हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे व जास्त दिवस टिकावे यासाठी सरपंच व गावकऱ्यांची मागणी आहे परंतु कामाची सुरुवात पाहून वाटत नाही की हा रस्ता जास्त दिवस टिकेल.

        जरी रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले नाही तर गावाचे युवा नेते राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष पुन्हा रस्त्यावर उतरतील एक मोठे आंदोलन पुन्हा होईल व संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाईची मागणी करतील अशी चर्चा दलवाडे गावात व परिसरात सुरू आहे यासाठी प्रशासनाने सदर कामात अधिक लक्ष घालून कामाची गुणवत्ता व दर्जा तसेच आलेले मटेरियल ची टेस्टिंग करून घेणे अतिशय गरजेचे आहे अन्यथा संबंधित यंत्रणेतले संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाईची मागणी देखील केली जाईल अशी चर्चा आज सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)