डोनेशनप्रकरणी संस्था चालकांवर चौकशी करून गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत धन्यवाद आंदोलन सुरूच ठेवणार

0

 


डोनेशनप्रकरणी संस्था चालकांवर चौकशी करून गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत धन्यवाद आंदोलन सुरूच ठेवणार 

रिपब्लिकन सेनेचे समाधान बैसाणे यांचा इशारा 

जन संघर्ष न्यूज

धुळे :-  शहरातील जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी डोनेशनची मागणी करत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे करत जेल रोड येथे 3 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान संबंधित शाळेची चौकशी करून गुन्हे दाखल करावे व संस्थेची मान्यता रद्द करावी, अशी आमची मागणी असल्याचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.

धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद झाली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष बैसाणे यांनी सांगितले की,   जयहिंद व हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात साहिल राज जाधव या मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून पाचवीत प्रवेशासाठी शाळेचे चेअरमन, मुख्याध्यापक व व कर्मचार्‍यांकडून 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.  डोनेशन अभावी प्रवेश नाकारण्यात आला. या संदर्भात शिक्षणाधिकार्‍यांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी शाळेला आदेशपत्र दिले तरी शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. शाळेकडून डोनेशन मागितल्याचा व्हिडिओ पुरावा देखील आपल्याकडे असल्याचे बैसाणे यांनी सांगितले. संस्थेविरोधात अनेक निवेदने व स्मरणपत्रे देवुनही कारवाई झाली नाही. त्यामुळे आठ दिवसांत संस्थेची चौकशी व कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठवु, असा इशाराही यावेळी बैसाणे यांनी दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)