रक्षाबंधनानिमित्त महिला कामगारांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

0

 

रक्षाबंधनानिमित्त महिला कामगारांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :-  भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, धुळे यांच्या वतीने रक्षाबंधन या पवित्र सणानिमित्त महिला कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन धुळे शहर आमदार श्री. अनुपभैय्या अग्रवाल ,धुळे ग्रामीण आमदार रामदादा भदाणे यांच्या हस्ते झाले .

 कार्यक्रमाचे आयोजन भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. भगवानजी चितळकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. देवदासजी मिस्त्री, प्रदेश उपाध्यक्ष श्री. विजय भाऊ पवार, उत्तर महाराष्ट्र सचिव श्री. दिलीपजी सनरे आणि सरचिटणीस श्री. अंकुशजी नंदवाळकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

शिबिरात महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी विविध तपासण्या, सल्लामसलत आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे अनेक महिला कामगारांना थेट लाभ मिळाला.

उद्घाटन प्रसंगी आमदार श्री. अनुपभैय्या अग्रवाल म्हणाले, "भारतीय जनता पक्ष तर्फे लाडक्या बहिणीची काळजी वेळोवेळी घेतली जाते हे पाहून मला आनंद झाला. महिला कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे आणि अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होते."

कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, धुळे महानगरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि अशा आरोग्य शिबिरांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)