सर्वधर्मीय मानले जाणारे अंजान शाह दाता सरकार बाबा यांचा उर्स,संदल महोत्सव 2025 उत्साहात साजरा
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- शहरातील संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील प्राचीन व प्रख्यात असलेले सुफी संत हजरत अंजान शाह दाता सरकार र.अ. बाबा यांचा उर्स ,संदल महोत्सव सालाबादप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात सर्व धर्मातील हिंदू मुस्लिम भाविकांचे मोठ्या प्रमाणात समावेश असतो, तसेच हजरत पीर अंजनशाह दाता सरकार र.अ. यांच्या उर्स कार्यक्रमाची वैशिष्ट म्हणजे या पंधरा दिवसाच्या त्यांच्या उर्स कालावधीत धुळे शहरासह महाराष्ट्र,गुजरात,मध्य प्रदेश कर्नाटक व राजस्थान आदी राज्यातून श्रद्धाळू भावीक दर्शनासाठी येत असतात. व नवसाला पावणाऱ्या या देवस्थानावर विविध नवस फेडून आपली श्रद्धा व्यक्त करतात,पूर्ण दिवस भाविक भंडाऱ्याच्या लाभ घेत असतात,या महोत्सवात ऊर्स अंजान शाही खानदेश कुतुब दाता सरकार यांच्या संदल मध्ये हिंदू मुस्लिम समाविष्ट दिसून आले तसेच भीम बुद्ध सिल्वर सेवाभावी संस्थाचे राजुबाबा पवार अर्जुन राजेश्री राजेंद्र पवार BobbY व सर्व सहकारी मित्र सहभागी झाले होते. दिनांक 9-9-25 रोजी मोठ्या उत्साहात संदल व उर्स साजरा करण्यात आला.

