राप साक्री आगार प्रमुख यांना धमकवणाऱ्यांचा कर्मचारी संघटने कडून जाहीर निषेध
जनसंघर्ष न्यूज
साक्री :- दि.9 सप्टेंबर 2025 रोजी साक्री आगारातील जुन्या बसेस व प्रवाशांच्या अडिअडचणी मांडण्यासाठी श्री अरुण अहिरराव, उमाकांत अहिरराव,धीरज देसले,हे आगार व्यवस्थापक दालनात चर्चेसाठी आले असता त्यावेळी आगार व्यवस्थापक दालनात कार्यशाळा अधिक्षक योगेश शिंगाणे,स्थानक प्रमुख कुणाल घरमोडे,वरिष्ठ लिपीक राजेंद्र पाटिल,वसीम पठाण हे देखील उपस्थीत होते चर्चा सुरु असतांनाच श्री धीरज देसले यांनी सांगितले कि येत्या आठ दिवसांत नवीन बसेस जर उपलब्ध केल्या नाहीत तर तुमच्या जुन्या बसेस फोडणार व नंतर तुम्हाला देखील फोडणार या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज साक्री आगारातील कामगारांच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी प्रचंड कामगार बंधु व भगिनीनी उपस्थीती दर्शवली होती या वेळी निषेध करण्यासाठी आगारातील राप कर्मचारी कुंदन ठाकरे ,रमेश वाघ,सुनिल पाटिल,राजेद्र पाटिल,महेश भदाणे,शरद खैरनार,दिनेश नेरकर,लक्ष्मी अहिरे,सोनाली साबळे ,के डि नेरकर,हिंमत सोनवणे, शिवाजी बागले ,नाना साळवे आदि कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

