आमदार अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्रक्रिया

0

धुळे : आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी एबी फाउंडेशनतर्फे मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी मुंबईकडे जाणाऱ्या रुग्णांना शुभेच्छा देताना आमदार अनुप अग्रवाल, डॉ. सुशील महाजन, गजेंद्र अंपळकर, विजय पाच्छापूरकर, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, जयश्री अहिरराव, सारिका अग्रवाल, मोहिनी गौड, यशवंत येवलेकर, पवन जाजू, पृथ्वीराज पाटील, चेतन मंडोरे, सुनील कपिल, प्रथमेश गांधी, मोहित देसले आदी. 


आमदार अग्रवाल यांच्या वाढदिवस निमित्त मोफत शस्रक्रिया

एबी फाउंडेशनतर्फे मोतीबिंदूमुक्त धुळे शहर अभियानाला प्रारंभ

दोन टप्प्यांमध्ये ५० रुग्णांना घेऊन पहिली खेप मुंबईकडे रवाना

जनसंघर्ष न्यूज 

धुळे :- शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दातृत्वातील एबी फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदूमुक्त धुळे शहर अभियानाला प्रारंभ झाला. यामध्ये आज सकाळी २५ व दुपारी २५ अशा दोन टप्प्यांमध्ये रुग्णांना घेऊन वाहने मुंबईकडे रवाना झाली. या रुग्णांना आज सकाळी दहाला एबी फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ शस्रक्रियेसाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला. तीन दिवस मुंबईत राहणाऱ्या या सर्व रुग्णांची एबी फाउंडेशनच्या माध्यमातून चहा-नाश्ता-जेवण अशी सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.

एबी फाउंडेशनतर्फे आमदार अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदूमुक्त धुळे शहर अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये फाउंडेशनकडे आतापर्यंत सुमारे ८५० रुग्णांनी मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी नावनोंदणी केली आहे. टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर मुंबईतील नामांकित रुग्णालयात अद्ययावत दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदूची मोफत शस्रक्रिया होणार आहे. त्याअंतर्गत आज सकाळी दहाला २५ रुग्णांना घेऊन पहिले वाहन, तर दुपारी दोनला २५ रुग्णांना घेऊन दुसरे वाहन मुंबईकडे रवाना झाले. या सर्व ५० रुग्णांवर उद्या (ता. १२) मोफत शस्रक्रिया होतील. शनिवारी हे सर्व रुग्ण वाहनाने धुळ्याला परत येतील. या तीन दिवसांत रुग्णांसाठी चहा-नाश्ता-भोजन आदी सर्व सुविधा एबी फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.

मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी मुंबईला रवाना होणाऱ्या रुग्णांना आज सकाळी एबी फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा व निरोप देण्यात आला. आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, महादेव परदेशी, माजी नगरसेविका मायादेवी परदेशी, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, सारिका अग्रवाल, मोहिनी गौड, महानगर सरचिटणीस पवन जाजू, सुनील कपिल, महानगर उपाध्यक्ष यशवंत येवलेकर, पृथ्वीराज पाटील, चेतन मंडोरे, मंडळाध्यक्ष प्रथमेश गांधी, मोहित देसले यांच्यासह रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

एबी फाउंडेशनतर्फे मोतीबिंदूमुक्त धुळे शहर अभियानास प्रारंभ झाला. त्याअंतर्गत आज दोन टप्प्यांत मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी ५० रुग्णांना घेऊन दोन वाहने मुंबईकडे रवाना झाली. या रुग्णांवर उद्या (ता. १२) मुंबईतील नामांकित रुग्णालयात शस्रक्रिया होईल. शस्रक्रियेनंतर शनिवारपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवले जाईल. या तीन दिवसांमध्ये फाउंडेशनतर्फे सर्व रुग्णांची चहा-नाश्ता-भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ८५० नागरिकांची मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी नोंदणी झाली असून, सर्व पात्र रुग्णांवर एबी फाउंडेशनतर्फे टप्प्याटप्प्याने मुंबईत शस्रक्रिया होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. सर्व रुग्णांना आरोग्य लाभो, याच सदिच्छा देतो असे आमदार अनुप अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)