प्लास्टिकच्या कप-चाळणीं विक्रीवर बंदी करा ; प्रदीप नन्नवरे यांचे तहसीलदारांना निवेदन

0

 



प्लास्टिकच्या कप-चाळणीं विक्रीवर बंदी करा ; प्रदीप नन्नवरे यांचे तहसीलदारांना निवेदन

जनसंघर्ष न्यूज 

पूर्णा (प्रतिनिधी) :-

       परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे कप व चहा चाळणीचा वापर होत असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे या वापरावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्लास्टिकवर गरम पाणी किंवा चहा आल्यास त्यातून रासायनिक घटक बाहेर पडून थेट मानवाच्या शरीरात जातात. परिणामी कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होण्याचा धोका वाढतो. “आज गोरगरिबांना साध्या चहाच्या कपातूनही जहर मिळत आहे, ही गंभीर बाब प्रशासनाने तातडीने लक्षात घेणे आवश्यक आहे,” असे नन्नवरे यांनी म्हटले आहे.

याप्रसंगी त्यांनी तीन ठोस मागण्या केल्या –

1. प्लास्टिकचे कप व चहा चाळणी विक्री व वापरास बंदी घालावी.

2. बाजारपेठ व हॉटेलांमध्ये तपासणी मोहीम राबवून दोषींवर कारवाई करावी.

3. पर्यावरणपूरक व आरोग्यदायी पर्यायांचा वापर प्रोत्साहित करावा.

हे निवेदन तहसीलदारांना देतानाच,

नगर परिषद पूर्णा व पोलीस स्टेशन पूर्णा यांनाही प्रत पाठविण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)