ब्राह्मण समाजाचा 26 ऑक्टोबर रोजी धुळ्यात उत्तर महाराष्ट्र स्तरीय भव्य मेळावा

0

 

ब्राह्मण समाजाचा 26 ऑक्टोबर रोजी धुळ्यात उत्तर महाराष्ट्र स्तरीय भव्य मेळावा 

वाडीभोकर रोड येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार

जनसंघर्ष न्यूज 

     धुळे :-  परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेस वर्षपूर्ती झाल्याबद्दल भगवान परशुराम युवा मंच तर्फे दि 26 ऑक्टोंबर 2025  रविवार रोजी धुळे येथील कमलाबाई कन्या शाळा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र ब्राह्मण समाजाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

       महाराष्ट्र शासनाकडे ब्राह्मण समाजातर्फे अनेकवेळा मागणी व पाठपुरावा करून परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी करण्यात आली होती त्यासं मान्यताही मिळाली त्यास आज वर्षपूर्तता प्राप्त झाली असल्याने सदर सोहळा संपन्न करण्यासाठी धुळे येथे भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त धुळे येथील नियोजनात संपर्क कार्यालयाचे उद्घाट्न व दुपारी 11 वाजेला मेळावा उ‌द्बोधन कार्यक्रम संपन्न होणार आहे.

       सकाळी 10 वाजता श्री परशुराम युवा मंचचे संपर्क कार्यालयाचे उ‌द्घाटन संपन्न होत आहे. सदर कार्यालय पद्मश्री टॉवरच्या बाजूला सिस्टेल पेट्रोल पंपाजवळ, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे या ठिकाणी होणार आहे. दुपारी 11 वाजता ब्राह्मण समाजासाठी भव्यदिव्य मेळावा कमलाबाई शाळा, धुळे, गरुड कॉम्प्लेक्स समोर संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष (कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले) माननीय श्री. आशिषजी दामले अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धुळे शहरातील कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री अनुपजी भैय्या अग्रवाल यासोबत मुख्य समन्वयक समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य माननीय श्री दीपकजी रणनवरे माननीय श्री योगेशजी जानतीकर सौ अर्चनाताई सरूडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तर प्रमुख उपस्थितीत हरिभक्त परायण श्री मुकुंद महाराज सोनगीरकर मठाधिपदी सोनगीर हरी भक्त परायण भाऊ महाराज रुद्र मठाधिपती नारायणबुवा समाधी केज श्री धनंजय कुलकर्णी समन्वयक समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य अकोला श्री श्रीकांत जोशी समन्वयक समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य विजय नाना पाछापूरकर ब्राह्मण समाज धुळे एडवोकेट रामकृष्ण जोशी उर्फ बाबा जोशी ज्येष्ठ नेते ब्राह्मण समाज धुळे श्री सारंग केळकर अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण समाज महासंघ कल्याण हे उपस्थित राहणार आहेत.

       सदर कार्यक्रमात ब्राह्मण समाजातील समाज भुषण व समाजरत्न यांचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्रातील समाविष्ट जिल्हे समाविष्ट जिल्ह्यातील तालुके परिसर या भागातील ब्राह्मण समाजातील युवक युवती जेष्ठ श्रेष्ठ सन्माननीय व्यक्ती त्याचबरोबर समाजास व सर्व समाजांना मार्गदर्शन करणारे सन्माननीय पाहुणे उपस्थित राहणार आहेत उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार भुसावळ जळगाव अमळनेर भडगाव पाचोरा चोपड चाळीस गाव मालेगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित राहतील तसेच धुळे नंदुरबार यासंह नाशिक जिल्ह्यातील व तालुक्यातील तमाम ब्रह्म वृंद महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत.

      धुळे येथे संपन्न होणारा ब्राह्मण समाज मेळावा अतिशय अभूतपूर्व व्हावा यासाठी सर्वत्र समाज बांधव मोठ्या प्रमाणावर संपर्क साधत आहे जय परशुराम महामंडळाच्या माध्यमातून होणारे उद्बोधन ब्राह्मण समाजातील सर्वांसाठी अतिशय उपयुक्त होणार आहे परशुराम महामंडळ नेमके काय या माध्यमातून कशाप्रकारे आपल्याला सहभाग घेता येईल उद्योग व्यवसाय कसे करता येतील यासाठी आवश्यक अर्थसहाय्य कसे प्राप्त करून घेता येतील यासह अनेक बाबतीत महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आशिष जी दामले यांच्या माध्यमातून उद्‌बोधन करण्यात येणार आहे मेळावा यशस्वीतेसाठी धुळे जिल्ह्यातील धुळे शहरातील नंदुरबार शिरपूर नाशिक मालेगाव दोंडाईचा साक्री पिंपळनेर शिंदखेडा या सर्व परिसरातून सर्व ब्रह्म वृंदांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक परशुराम युवा मंच व सर्व ब्राह्मण संघटना यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)