धुळे जिल्ह्यात थंडीचा पारा 8 अंशावर जिल्ह्यातील सकाळच्या शाळा एक तास उशिरा भरवा - युवा सेनेची मागणी

0

 

धुळे जिल्ह्यात थंडीचा पारा 8 अंशावर जिल्ह्यातील सकाळच्या शाळा एक तास उशिरा भरवा - युवा सेनेची मागणी 

जनसंघर्ष न्यूज

धुळे - शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्याने थंडीचा पारा आठ अंशावर गेला असून याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यातील सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असून त्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांचे वर्ग एक तास उशिराने भरावेत अशी मागणीचे निवेदन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश मराठे यांनी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे. 

        प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात जास्त थंडी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये धुळ्याचा समावेश आहे. रात्री ९ नंतर रस्ते निर्मनुष्य होतात. सकाळी देखील थंडीचे प्रमाण जास्त असते. थंडीतहीप्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सकाळी ६ वाजेला उठून शाळेची तयारी करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे. दरवर्षी जानेवारी नंतर थंडीची चाहुल लागते. परंतु यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यातच तापमानाचे प्रमाण कमी झाल्याने थंडीच्या प्रमाणातजास्त वाढ झाली आहे. यामुळे भर दुपारी सुद्धा थंडी वाजत आहे. तर सकाळी ७.१५ ला शाळेतील विद्यार्थी शाळेत जाणार कसे? वातावरण बदलामुळे भर थंडीत विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत जावे लागते यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या हिताकरीता शालेय वेळापत्रकात बदल करण्यात यावा. सकाळच्या सत्रातील सर्व वर्ग मराठी, इंग्रजी, महानगरपालिकेच्या शाळा तसेच सर्व माध्यमातील शाळांचे वेळापत्रक बदलणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ८ ते १२ अंश सेल्सियस असे पर्यंत सकाळच्या सत्रात भरणारे सर्व वर्ग उशीराने भरविण्याच्या तात्काळ सुचना सर्व शासकिय व खाजगी शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावेत अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे, महानगरप्रमुख अमित खंडेलवाल, उपमहानगरप्रमुख चेतन धामेचा, प्रतिक शिंदे, अनिल ठाकुर, उपमहानगरप्रमुख राहूल ठाकुर, शुभम पाटील, राकेश चव्हाण, कल्पेश चौधरी, दिगंबर कासार, दिनेश चव्हाण, नितीन धनगर, देवेंद्र गायकवाड, केतन शेलार, सुमित चौधरी, राम चोपडेकर, नितीन मराठे, आकाश पाटील, प्रविण मराठे, राहुल मोरे, आदित्य वानखेडे, सागर पाटील यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)