निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांचा अवैद्य दारू तस्करांना दणका ;
आरोपींकडून 30 लाख 17 हजार रुपयाचा मुद्दामाल जप्त
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- दि.१० जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली होती की, पारोळा कडून धुळे कडे जाणारे रोडावर मुकटी ता.जि. धुळे गावाचे शिवारातुन ट्रक क्रमांक MH १८ BH ८८९१ याचेतुन रॉकेट नावाची देशी दारुची चोरटी वाहतुक करण्यात येणार आहे. सदरची माहिती त्यांनी मा. पोलीस अधीक्षक धुळे यांना कळवून तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, धुळे ग्रामिण विभाग श्री. संजय बंबाले यांचे मार्गदर्शन घेवून त्याअनुशंगाने पोनि श्री. धनंजय पाटील यांनी पोसई प्रशांत राठोड, पोहेको २८३ योगेश पाटील, पोहेकों ६४९ कुणाल पानपाटील, पोहेकों १५४५ सोमनाथ कांबळे, पोहेको १३४० सुमित ठाकुर, पोहेको १३०६ चेतन कंखरे, पोहेकॉ ११४७ मुकेश पवार, पोकों ८५० विशाल पाटील, पोकॉ५ ३७ प्रमोद पाटील पोकों १७५४ रविंद्र सोनवणे, असई रविंद्र राजपुत यांचे पथक तयार करुन बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने नमुद पथकाने दि.१०.०१.२०२६ रोती मध्यरात्री ०१.०० वा. ते ०२.३६ वा पावेतों सदर वाहनाचा शोध घेवून सदर ट्रक मुकटी गावाचे शिवाराज हॉटेल एकता चे आवारात येवुन मध्यरात्री अंधारात चालकाने सदर ट्रक उभा करुन त्यातुन बॉक्स पीकअप वाहात उतरवित असतांना दिसल्याने त्याचा संशय आल्याने नमुद पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन १) राकेश छगनलाल जैन वय ३५ रा. प्लॉट नं. १२१, शांतीनगर, अभय कॉलेज, जवळ, धुळे, २) दिपक अशोक शिंदे वय ३५ रा. नथ्थुवाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे, ३) सुदाम भुरा गोसावी वय ४२ रा. भाटपुरा ता. शिरपुर जि. धुळेअशांना त्यांचे ताब्यातील वाहनांसह पकडुन पंचांसमोर पंचनामाकरुन झडती घेतली असता त्यात खालील प्रमाणे वर्णणाचा व किंमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईत ३ लाख ४ हजार रुपये किंमतीचा ट्रक क्रमांक MH १८ ८८९१ याचेत रॉकेट देशी दारुचे ७६ बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये १०० बॉटल, प्रत्येक बॉटलची किंमत ४० रुपये, बेंच क्रमांक ४०२ (एका बॉक्सची किंमत ४ हजार रुपये) , १ लाख ९२ हजार रुपये किंमतीची पीकअप वाहन क्रमांक MH ०४ JU ८७२२ मध्ये रॉकेट देशी दारुचे ४८ बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये १०० बॉटल, प्रत्येक बॉटलची किंमत ४० रुपये, बेंच क्रमांक ४०२ (एका बॉक्सची किंमत ४ हजार रुपये , १५ लाख रुपये किंमतीची ट्रक क्रमांक MH १८ ८८९१ जु वा कि अं. जु वा कि अं., ५ लाख रुपये किंमतीची पीकअप वाहन क्रमांक MH ०४ JU ८७२२ जु वा कि अं. ,५ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH ०४ ED ९३३४ जु वा कि अं. व ४ मोबाईल असा एकूण ३० लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल व वाहने जप्त करण्यात आली असुन सदर प्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई), (अ), ८३, १०८, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आगामी महानगर पालीकेचे निवडणुकीचे पार्श्वभुमीवर धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी, श्री. धनंजय पाटील, पोसई प्रशांत राठोड, व पोलीस अंमलदार यांचे पथकने वरील प्रमाणे देशी दारुचा मोठ्या प्रमाणावर मिळुन आलेला साठा चोरटी वाहतुक करतांना उघडकीस आणुन कायदेशीर कारवाई केल्याने वरिष्ठांकडुन धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

