प्रभाग क्र.९ मध्ये भाजपाचे उमेदवारांचा प्रचार आघाडीवर
उमेदवार पूनम शिरसाठ, प्रदीप बैरागी, लताबाई सोनार संजय जाधवांना जनतेची पसंती
भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव, बेटी पढाओ च्या प्रदेश संयोजीका सौ. अल्पा अनुप अग्रवाल यांचा सक्रिय सहभाग
जनसंघर्ष न्यूज
धुळे - शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून प्रभाग क्र.९ मध्ये भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार आघाडीवर असून प्रभागात भाजपाचा बोलबाला दिसत असल्याने विरोधकांची झोप उडाली आहे. जनतेच्या सहभागाने होणाऱ्याशक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांना धडकी भरली आहे.
प्रभाग क्र.९ च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलींमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव, बेटी पढावच्या प्रदेशसंयोजीका सौ. अल्पा अनुप अग्रवाल यांनी सक्रिय सहभाग नोंदविल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. भाजपाने प्रभाग क्र.९ मध्ये पूनम जितेंद्र शिरसाठ, प्रदीप पुरणदास बैरागी, सौ.लताबाई यशवंत पोतदार (सोनार), संजय सुधाकर जाधव यांना उमेदवारी दिली आहे. चारही सक्षम उमेदवारांची बलस्थाने आहेत. भारतीय जनता पक्षाने या प्रभागात केलेल्या विकासकामांच्या बळावरउमेदवार जनतेसमोर जात आहे. त्यांच्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
धुळे शहराच्या मिल परिसरातील नारायण मास्तर चाळीतून निघालेल्या प्रचार रॅलीनेसंपूर्ण प्रभाग दणाणून सोडला. या भव्य रॅलीला सौ. अल्पा अनुप अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता, प्रभाग ९ मध्ये कमळ फुलणार हे स्पष्ट संकेतरॅलीला मिळणाऱ्या प्रतिसादातून दिसत आहे. सुशासन, पारदर्शक कारभार आणि सर्वांगीण विकासाचा विश्वास भाजपाचे उमेदवार जनतेला देत आहेत. आज निघालेल्या रॅलीला नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने चारही उमेदवार भारावले आहेत. प्रभाग क्र.९ मधील जनतेच्या साथीने उमेदवार विजयाची नौका पार करतील असा विश्वास भाजपा कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

