रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला अधिकृत जाहीर पाठिंबा
मुंबई :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला अधिकृत जाहीर पाठिंबा दिला आहे. हा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी दिली.
भारतीय लोकशाही अधिक मजबूत करणे, सामाजिक न्याय, समता, बंधुता व संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे या समान उद्दिष्टांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) यांची विचारधारा सुसंगत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सामाजिक परिवर्तनाची लढाई अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा शशिकांत शिंदे साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ते माननीय विकास लवांडे.रिपाई चे सचिव माननीय अशोक ससाने. माननीय अरुण भिंगारदिवे. माननीय तानाजी मिसळे. मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष समीर लागझरे. उपाध्यक्ष माननीय दिलीप कदम. अरुण भालेराव. माननीय प्रवीण पवार. माननीय चंद्रशेखर सपकाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होती

