सीमेवरील जवानाकडून धुळे मनपा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर १६ नंबर प्रभागातील लढ्यास आर्थिक बळ
जोगती रवीभाऊंना आर्मी जवाना कडून ११,१११ रूपयांचा आर्थिक पाठिंबा
जनसंघर्ष न्यूज
देशाच्या सीमेवर देशसेवेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सैन्यदलातील जवानाने लोकशाहीच्या बळकटीसाठी पुढाकार घेतल्याचे उदाहरण प्रभाग क्रमांक १६ मध्ये पाहायला मिळाले. सैन्य दलात कार्यरत असलेले भूषण अशोकराव पाटील यांनी आपल्या प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या पार्वती परशुराम जोगी (रवीभाऊ) यांना ११,१११ रुपये आर्थिक मदत देत आपली सामाजिक बांधिलकी जपली. भूषण पाटील यांनी सांगितले की, जनतेकडून जमा होणाऱ्या कराच्या पैशातून भारत सरकार आम्हाला मानधन देते. त्या पगारातून, आपल्या परिस्थितीनुसार आणि परिवाराच्या वतीने, ही मदत देण्यात आली आहे. रवीभाऊ हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले उमेदवार असून त्यांनी प्रभागातील प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी सामान्य माणसाने पुढे येणे गरजेचे असून, आपल्या प्रभागातील सक्षम नागरिकांनी रवीभाऊंना मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे. “आपल्या मधूनच आपला नगरसेवक निवडून आणूया,” असे सांगत त्यांनी प्रभागातील मतदारांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.
देशसेवेतील जवानाने दाखविलेल्या या योगदानामुळे प्रभागात सकारात्मक चर्चा सुरू असून, लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांच्या सहभागाला नवे बळ मिळाले आहे.

