जानेफळ येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव

0

 

जानेफळ येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव

समाजसेविका ॲड.माधुरी देवानंद पवार यांचा तर्फे पत्रकारांच्या लेखणीचा सन्मान 

जनसंघर्ष न्यूज 

मेहकर प्रतिनिधी - दिपक देशमुख 

     लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी प्रामाणिकपणे पेलणाऱ्या पत्रकारांच्या लेखणीचा गौरव करणारा एक भव्य, प्रेरणादायी आणि सत्यनिष्ठ पत्रकारांचा गौरव कार्यक्रम

       मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिनानिमित्त जानेफळ येथे ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सप्तशृंगी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुख्य शाखा-जानेफळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 'पत्रकार सन्मान सोहळा' मोठ्या उत्साहात पार पडणार आहे .

        निर्भीड, निष्पक्ष आणि जनहितवादी पत्रकारितेला बळ देण्याच्या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून सप्तशृंगी महिला अर्बनच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. त्यामुळे मेहकर-लोणार तालुक्यातील पत्रकार बांधवांमध्ये या कार्यक्रमाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या पत्रकार सन्मान सोहळ्यास राजकीय,सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण घुमरे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, मेहकर विधानसभा नेते ॲड. अनंता वानखेडे, माजी नगराध्यक्ष कासम गवळी, तसेच माजी सभापती नंदू बोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

        मेहकर व लोणार शहरासह तालुक्यातील सर्व माध्यमांतील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. कु. माधुरीताई देवानंद पवार, अध्यक्षा, सप्तशृंगी महिला अर्बन,देवानंद त्र्यंबक पवार, समन्वयक, मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघ तथा संस्थापक अध्यक्ष, सप्तशृंगी महिला अर्बन यांनी केले आहे.तर विष्णु पुंडलीक वाकळे, पत्रकार व संस्थापक उपाध्यक्ष सप्तशृंगी महिला अर्बन आणि विष्णु आखरे पाटील, पत्रकार हे या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)